प्रतिष्ठा न्यूज

गगनबावडा शैक्षणिक केंद्र म्हणून पुढे आणणार : प्रा.सतिश देसाई यांची ग्वाही ; डॉ.ग.गो.जाधव महाविद्यालयात माजी विद्यार्थी व पालक मेळावा संपन्न

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालयात माजी विद्यार्थी व पालक मेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे उदघाटन रोपाला पाणी घालून करण्यात आले. या कार्यक्रमाच्या वेळी अध्यक्ष प्रा. सतिश देसाई यांनी विद्यार्थ्यांच्या करिता आवश्यकत्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, त्याच बरोबर भाविष्यात पालकांच्या मागणीनुसार व विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार नवनवीन व्यवसायिक अभ्यासक्रम संस्थेमार्फत उपलब्ध करून गगनबावड्यास एक शैक्षणिक केंद्र म्हणून पुढे आणण्यात आनंदी शिक्षण संस्थेमार्फत पुढाकार घेणारअशी ग्वाही दिली . या कार्यक्रमास माजी विद्यार्थ संघटनेचे अध्यक्ष व इतर ‍पदाधिकारी उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील विद्यर्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. व त्यांनी आनंदी शिक्षणसंस्थे मार्फत सुरू केलेल्या नवनवीन व्यवसायिक अभ्यासक्रमाबद्दल संस्थेचे आभार व्यक्त केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. ए. एस. कांबळे यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रा. ए.आर. गावकर यांनी मानले.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.एस.एस.पानारी, प्रा. ए.एस.जमादार प्रा. घाटगे एस. एस. प्रा. सरनोबत आर. आर प्रा. येडगे आर. आर.प्रा. एस.एस.देसाई व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.