प्रतिष्ठा न्यूज

सांगली जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई व चालकांच्या रिक्त पदांची भरती प्रक्रियेचा मैदानी चाचणीचा २ रा दिवस पूर्ण

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : दि. १९/०६/२०२४ पासुन सांगली जिल्हा पोलीस दलात पुरुष व महिला पोलीस शिपाई पदांकरीता २७ रिक्त पदे, चालक पोलीस शिपाई पदांकरीता १३ रिक्त पदे अशा एकुण ४० रिक्त जागेकरीता पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीची प्रक्रिया चालु झाली आहे.

आज दि. २०/०६/२०२४ रोजी पोलीस मुख्यालय, विश्रामबाग, सांगली येथे पोलीस शिपाई चालक पदाकरीता ७३१ उमेदवार मैदानी चाचणी करीता बोलाविण्यात आले होते. त्यापैकी ४८७ उमेदवार मैदानी चाचणीस प्रत्यक्ष हजर राहिले. त्यापैकी ४५१ उमेदवारांनी मैदानी चाचणीतील छाती व उंचीच्या चाचणीत पात्र झाल्यानंतर त्यांनी मैदानी चाचणी पुर्ण केली आहे.

महिला पोलीस शिपाई पदाकरीता ०१ महिला उमेदवारास मैदानी चाचणी करीता बोलाविण्यात आले होते. सदर महिला उमेदवार मैदानी चाचणी पुर्ण केली आहे.

सांगली जिल्हा पोलीस भरती प्रक्रिया ही मा. पोलीस अधीक्षक, संदीप घुगे, मा. अपर पोलीस अधीक्षक, रितु खोखर, सांगली यांचे मार्गदर्शनाखाली योग्य तो पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

उदईक दि. २१/०६/२०२४ रोजी पोलीस शिपाई पदाकरीता १४ पुरुष उमेदवार व पोलीस शिपाई चालक पदाकरीता ०९ पुरुष उमेदवार आणि महिला पोलीस शिपाई पदाकरीता १४१ महिला उमेदवार आणि महिला पोलीस शिपाई चालक पदाकरीता ४१ महिला उमेदवारांना मैदानी चाचणी करीता बोलाविण्यात आले आहे.

सदरची पोलीस भरती प्रक्रिया ही व्हिडीओग्राफी, सीसीटीव्ही मध्ये चित्रीत करुन पारदर्शक पद्धतीने राबविली जात असल्याने उमेदवारांनी कोणत्याही अमिषाला बळी पडु नये, तसेच भरती प्रक्रिये संदर्भात कोणताही संभ्रम निर्माण झाला असलेस सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करणेत येत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.