प्रतिष्ठा न्यूज

युवक,युवतींनी राष्ट्रमाता जिजाऊ माॅसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा आदर्श घ्यावा : सेवानिवृत्त क्रिडा अधिकारी श्री संधू

प्रतिष्ठा न्यूज / राजू पवार
नांदेड दि. 17 : राजर्षी शाहू विद्यालय व ज्यूनिअर कॉलेज, राजर्षी शाहू बालक मंदिर ,कस्तुरबा गांधी विद्यालय येथे वार्षिक स्नेहसंमेलन खेळ व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात दरवर्षीप्रमाणे यावर्षी साजरे करण्यात येत आहेत .या कार्यक्रमाचे उद्घाटन सेवानिवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी श्री गुरुदीपसिंघ प्रेमसिंघ संधू यांच्या हस्ते उद्घाटन उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री बी. एम. हंगरगे हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना श्री गुरुदीपसिंघ संधू म्हणाले की, आजच्या काळात राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा विद्यार्थ्यांनी आदर्श घेतला पाहिजे .स्वामी विवेकानंद विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असत की, विद्यार्थ्यांनी तत्पर राहिले पाहिजे. उठा,जागे व्हा !आणि आपले ध्येय गाठेपर्य़त थांबू नका. असा संदेश त्यांनी आपल्याला दिलेला आहे. तसेच राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या शूर वीर बालकावर संस्कार करून , रामायण महाभारत यांच्या गोष्टी सांगून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारखे शूर वीर राजे घडविले. त्यांनी जगाच्या पाठीवर एक आदर्श राजा निर्माण केला. छ.राजे शिवाजी महाराज यांच्या वर राष्ट्रमाता जिजाऊ यांनी बालपणापासूनच रामायण महाभारत यांच्या गोष्टी सांगून योग्य,आदर्श संस्कार घडविले .त्यामुळे आपण थोर युगपुरुष यांचे विचार आत्मसात करावे. ते पुढे बोलतांना म्हणाले की आज आपल्या देशातील युवक युवतींनी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांचे आणि स्वामी विवेकानंद यांचे विचार अंगीकारने काळाची गरज आहे. त्यांच्या विचारा चा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे तरच आपला भारत एक विकसित राष्ट्र म्हणून जगाच्या पाठीवर उभा राहील असे आव्हान त्यांनी यावेळी केले. त्यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित शालेय सांस्कृतिक, विविध गुणदर्शन,क्रिडा,कार्यक्रमाचे,वार्षिक स्नेह संमेलनाचे नारळ फोडून उद्घाटन करण्यात आले.तसेच तसेच यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री गुरुदेव सिंग यांचा मुख्याध्यापक श्री बी एम हंगरगे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला
यावेळी मुख्याध्यापक श्री बालाजी हंगरगे,पर्यवेक्षक श्री पंजाबराव सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी सेवानिवृत्त क्रिडा अधिकारी श्री संधू, मुख्याध्यापक श्री बी एम हंगरगे आणि कस्तुरबा गांधी विद्यालयाचे मु.अ. श्री बि.डी. देशमुख, पर्यवेक्षक श्री पंजाबराव सावंत यांच्या हस्ते राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माॅसाहेब आणि थोर युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक श्री टी एन. रामनबैनवाड यांनी केले तर आभार सांस्कृतीक विभाग प्रमुख शिवानंद टापरे यांनी मांडले. यावेळी शाळेतील सर्व कर्मचारी शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.