प्रतिष्ठा न्यूज

खासदार विशालदादा पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि.13 : खासदार विशालदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राजीव गांधी पंचायत राज संघटनेच्या वतीने सांगली मिरज रस्त्यालगत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या श्रीमती जयश्रीताई पाटील, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रा. डॉ.सिकंदर जमादार, वसंतदादा साखर कारखान्याचे संचालक अमितदादा पाटील, विशालदादा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बंडू पाटील,जैन फाउंडेशन चे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील, काँग्रेस सेवा दलाचे शहर जिल्हाध्यक्ष पै .प्रकाश जगताप , प्रा .ऋषिकेश पाटील, किशोर नावंधर या मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाचे संयोजन राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे जिल्हाध्यक्ष देशभूषण पाटील यांनी केले होते.याप्रसंगी राकेश कुंभार,जमीर पटाईत ,सुजित पवार, सुधीर कांबळे, प्रतीक राजमाने, शैलेंद्र पिराळे, अमित बस्तवडे, अमोल पाटील,महावीर खोत, सुरेश यलमार ,संदीप रसाळ आदि काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर खासदर मा.श्री.विशालदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उद्योगरत्न वि. रा वेलणकर बालकाश्रम येथे फळ व खाऊ वाटपाचा कार्यक्रम पार पड़ला यावेळी वसंतदादा साखर कारखान्याचे संचालक मा.अमितदादा पाटील , विशालदादा युवा प्रतिष्ठान चे जिल्हाध्यक्ष मा.हेमंत ऊर्फ बंडू तात्या पाटील, संचालक मा.प्रदीपभाऊ पाटील,सर्व कार्यकर्त उपस्थित होते. वृद्धसेवा आश्रम कुपवाड रोड सांगली येथे खासदार विशाल दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी शशिकांत नागे, अख्तरभाई अत्तार, शिवराज पाटील, महावीर पाटील, विक्रम काटकर, अनुप पाटील उपस्थित होते.
तसेच खरसुंडी मध्ये जिल्हा परिषद मुलींच्या शाळेमध्ये खाऊ वाटप करण्यात आला तसेच कृष्णा रामा गुरव आश्रम शाळा या ठिकाणी केळी वाटप करण्यात आले तसेच वृक्षारोपण करण्यासाठी झाडे देण्यात आली यावेळी उपस्थित असलेले आटपाडी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष जयदीप भैय्या भोसले युवा नेते अध्यक्ष सचिन गुरव शिवसेना उद्धव ठाकरे तालुकाध्यक्ष शेखर निचळ आवटेवाडी सरपंच किरण पवार आज सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत देठे खरसुंडी सोसायटीचे चेअरमन जगदीश पुजारी खरसुंडी ग्रामपंचायत सदस्य सुभाष माळी खरसुंडी जोगेश्वरी शिक्षण प्रसारक संस्थेचे संस्थापक संचालक किशोर पुजारी सर सोसायटी माजी संचालक जहांगीर शेख दिलीप साळुंखे बाळासो केंगार दिलीप पाटील रामहरी जावीर युवराज पुजारी नितीन पाटील अधिक भिसे दिलीप माळी निलेश गुरव ऋषिकेश भिसे जिल्हा परिषद सर्व शिक्षक व कृष्णा राम गुरव आश्रम शाळेचा सर्व शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.