प्रतिष्ठा न्यूज

एकनाथ दादा पवार यांचा श्री मनोज पाटील जरांगे यांना जाहीर पाठिंबा; अखेर हाती बांधले शिवबंधन

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार
नांदेड : लोहा तालुक्याचे भूमिपुत्र तथा पिंपरी चिचवड महानगरपालिकेचे गटनेते, भाजपचे निष्ठावंत नेते, मन्याड फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ पवार यांनी मराठा आरक्षण मुद्यावरून आरक्षण लढयाचे प्रमुख मनोज पाटील जरांगे यांना पाठिंबा देत सध्या चे सरकार मराठा आरक्षणाचा तिढा सोडविण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप केला. भाजपचे निष्ठावंत नेते एकनाथ पवार यांनी भाजपच्या सर्व सदस्य पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. पवार यांनी भाजपला जय श्रीराम ठोकत दि. २५ ऑक्टोबर रोजी मातोश्रीवर उध्दव ठाकरे शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करून माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधून घेतले आहे. यावेळी शेकडो जिल्ह्यातील कार्यक्रते उपस्थित होते.

प्रारंभीपासूनच पिंपरी चिंचवडमध्ये राहून नांदेड ( लोहयाचे )भूमिपुत्र एकनाथ पवार भाजपच्या तालमीत वाढले. संघ परिवाराशी त्यांचा जवळचा संबंध राहिला. त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत गटनेते म्हणून काम पाहिले. लोहा- कंधार मतदारसंघात विकासाचा अनुशेष भरून काढावा, पिंपरी चिंचवडप्रमाणे या भागाचा देखील विकास व्हावा, बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, या भागात औद्योगिक वसाहत व्हावी हे ध्येय उराशी बाळगून एकनाथ पवार यांनी गत ४ वर्षांपासून मतदार संघाशी नाळ कायम ठेवली आहे. लोहा आणि कंधार तालुक्यातील प्रत्येक गावं, वाडी, तांडयांपर्यंत त्यांनी मन्याड फौंडेशनच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवून कार्यकर्ता जोडण्याचे काम केले व आपली ओळख निर्माण केली. आजघडीला मराठा आरक्षण प्रश्न प्रचंड तापला असताना मराठा आरक्षण भूमिका प्रभावीपणे मांडणारे मनोज पाटील जारांगे यांना भाजप महायुती सरकारकडून न्याय मिळत नसल्यामुळे एकनाथ पवार यांनी भाजपला जय श्रीराम करण्याचा निर्णय जाहीर केला. राज्यातील सरकार आरक्षण देईल असा आशावाद त्यांना वाटत होता. मात्र मुख्यमंत्री शिंदे,उपमुख्यमंत्री फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी समाजाला आरक्षण देण्यास विलंब लावला आहे.श्री मनोज पाटील जरांगे यांनी शासनाला दिलेली 40 दिवसाची मुदत संपली आहे. सरकार अपयशी ठरले आहे.त्यामुळे भाजपा प्रवक्ते एकनाथ दादा पवार यांनी अखेर भाजपा ला राम राम ठोकला आहे. विशेष म्हणजे लोहा- कंधार मध्ये यापूर्वीच शेकाप – शिवसेना ठाकरे गट युती आहे.
पवार यांचा २५ ऑक्टोबर रोजी रोजी वाढदिवस असल्याने त्या दिवशी ते मातोश्रीवर जाऊन ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून हाती शिवबंधन बांधले आहेत .
त्यांच्या पक्ष प्रवेशानंतर लोहा मतदार संघात शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना ठाकरे गट यांचे मतदारसंघात प्राबल्य राहणार हे मात्र नक्की.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.