प्रतिष्ठा न्यूज

हिंगोलीचे शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी दिला मराठा आरक्षणासाठी राजीनामा

प्रतिष्ठा न्यूज राजू पवार
नांदेड : हिंगोली जिल्ह्याचे लोकसभा मतदारसंघातील खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आपल्या पदाचा राजीनामा लोकसभेचे सभापती यांच्याकडे सुपूर्द केला आहे असे त्यांच्या संपर्क कार्यालयातून माहिती दिली आहे.
खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या राजीनामा पत्रातून म्हटले आहे की, आपण शेतकरी आणि समाजासाठी सक्रिय कार्यकर्ते आहोत. गेल्या अनेक वर्षापासून मराठा आरक्षण प्रश्न प्रलंबित आहे. शासनाचे याकडे सातत्याने दुर्लक्ष केले. मी शेतक-यासाठी आणि समाजासाठी लढणारा, आवाज उठविणारा सामान्य कार्यक्रता आहे.
शासन मराठा समाजाला आरक्षण देण्यास दिरंगाई करीत आहे .
दिवसेंदिवस मराठा आरक्षणासाठी समाजाच्या भावना तिव्र होत आहेत.त्यामुळे मी समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी खासदारकिचा राजीनामा देत आहे असे त्यांनी म्हटले आहे .आपण सामाजिक कार्यात सतत अग्रेसर राहत असतो . माझा मनोज पाटील जरांगे यांना आरक्षणासाठी जाहीर पाठिंबा आहे. विशेष म्हणजे खा.हेमंत पाटील यांनी यापूर्वी आरक्षणासाठी पुढाकार घेतला होता.
ग्रामीण,शहरी भागात आरक्षण लढा तिव्र झाला आहे.
त्यामुळे समाजाच्या भावना लक्षात घेऊन मी खासदारकी या पदाचा राजीनामा देत आहे असे त्यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.