प्रतिष्ठा न्यूज

विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवणार : महत्वाची कामे पहिल्यांदा हाती घेणार : नूतन आयुक्त सुनील पवार यांची नगरसेवकांना ग्वाही

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 12, (प्रतिनिधी ) : महापालिकेत आयुक्त म्हणून काम करत असताना विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवुन महत्वाच्या कामांचा ऍक्शन प्लॅन बनविणार आहे. अशा एक्शन प्लॅन नुसार महत्वाची विकासकामे पहिल्यांदा हाती घेणार असल्याची ग्वाही नूतन आयुक्त सुनील पवार यांनी मनपा नगरसेवकांना दिली.
स्थायी समिती सदस्य आणि नगरसेवकाकडून नूतन आयुक्त सुनील पवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी स्थायी सभापती निरंजन आवटी आणि सर्वच स्थायी सदस्य महिला नगरसेविका यानी सभेनंतर आयुक्त सुनील पवार यांचा सत्कार सत्कार करीत स्वागत केले. यावेळी नगरसेवक पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.