प्रतिष्ठा न्यूज

सांगलीच्या पुरपट्ट्यातील नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर व्हावे : महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आयुक्त सुनील पवार यांच्याकडून पुरभागाची पाहणी :

पाणी वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी धोका पत्करू नये : महापौर आयुक्तांचे जनतेला आवाहन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 12, (प्रतिनिधी ) : सांगली : सांगलीच्या पुरपट्ट्यातील नागरिकांनी पाणी येण्याची वाट न पाहता सुरक्षित स्थळी स्थलांतर व्हावे असे आवाहन महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आयुक्त सुनील पवार यांनी केले आहे.
शुक्रवारी महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि नूतन आयुक्त सुनील पवार पुरभागाची पाहणी केली. यावेळी सूर्यवंशी प्लॉट आणि आरवाडे प्लॉट मधील सहा कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पाणी वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी धोका पत्करू नये असे आवाहनही महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आयुक्त सुनील पवार यांनी जनतेला केले आहे.
आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारतात नूतन आयुक्त सुनील पवार यांनी तातडीनं पूर परिस्थितीची माहिती घेतली. तसेच पुरबधित भागात जाऊन जनतेशी संवाद साधला. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि उपायुक्त राहुल रोकडे हेही उपस्थित होते. सुरवातीला महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आयुक्त सुनील पवार यांनी तातपुरता निवारा केंद्राची माहिती घेत सर्व त्या सोयीसुविधा देण्याबाबत प्रशासनाला आदेशीत केले. त्यानंतर सूर्यवंशी प्लॉट आणि आरवाडे प्लॉट येथील पूर भागाची पाहणी करीत नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचा सुचना केल्या. तसेच पाणी वाढण्याची शक्यता असल्याने कोणीही कसलाही धोका पत्करू नये आणि पाणी येण्याची वाट पाहण्यापेक्षा आत्ताच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे वझे आवाहन केले. याचबरोबर महापालिका प्रशासनाने सुद्धा पुरपट्ट्यात स्पीकरद्वारे जनजागृती करावी आणि पाणी वाढण्यापूर्वी नागरिकांना स्थलांतर करण्याबाबत सूचित करावे असे आवाहनही महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आयुक्त सुनील पवार यांनी केले. यावेळी सहायक आयुक्त नितीन शिंदे, सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, धनंजय कांबळे, प्रणिल माने आदी उपस्थित होते.

नागरिकांनी महापालिकेच्या निवारा केंद्रात स्थलांतर व्हावे : आयुक्त सुनील पवार
पूर भागात पाणी वाढण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने खबरदारी म्हणून नागरिकांनी कशाचीही वेळ न पाहता आणि पाणी वाढण्याची वेळ न पाहता आपल्या कुटुंबासह सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे . ज्या नागरिकांना राहण्याची अडचण आहे त्यांनी महापालिकेच्या मनपाच्या शाळा क्रमांक 24 साखर कारखान्यासमोर शाळेत सुरू केलेल्या निवारा केंद्रात दाखल व्हावे आणि कोणतीही रिस्क घेऊ नये असे आवाहन केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.