प्रतिष्ठा न्यूज

तासगावात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यावर दंडात्मक कारवाई होणार : मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगांव शहरातील सर्व नागरिकांनी व व्यावसायिकांनी ओला व सुका असे कचऱ्याचे वर्गीकरण करावे व तो कचरा घंटागाडीतच टाकावा असे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी केले आहे.तसेच जर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकताना कोणी आढळल्यास त्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणेत येणार असलेचे ही त्यांनी सांगितले आहे.
घनकचरा व्यवस्थापन हाताळणी नियम २०१६ ची अंमलबजावणी नगरपरिषदेमार्फत तासगांव शहरामध्ये केली जाते.दि.५ जून २०२३ पासून घनकचरा व्यवस्थापन हाताळणी नियम २०१६ अन्वये तासगांव शहरातील सर्व नागरिकांनी, रहिवाशी, मालमत्ताधारकांनी व व्यावसायिकांनी ओला-सुका व घरगुती घातक अशा प्रकारे कचऱ्याचे वर्गीकरण करून डस्टबिनव्दारे घंटा गाडीतच देणे बंधनकारक आहे.
कचरा मिश्र स्वरूपात एकत्र करून दिल्यास त्या नागरिकांचा कचरा स्विकारला जाणार नाही व ते दंडात्मक कारवाईस पात्र राहतील, तसेच जे नागरिक कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी व इतरत्र कोठेही उघड्यावर कचरा टाकताना आढळून आल्यास त्या नागरिकांवर नियमानुसार दंडात्मक व कायदेशीर कारवाई करणेत येईल, असेही पृथ्वीराज पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.