प्रतिष्ठा न्यूज

MTDK RUN च्या माध्यमातून मिरजेमध्ये प्रथमच मॅरेथॉन चे आयोजन

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
मिरज : दास बहू उद्देशीय विश्वस्थ संस्था संचलित मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मिरज व मातोश्री तानुबाई दगडू खाडे पब्लिक स्कूल मालगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य सुरेश खाडे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत MTDK RUN स्पर्धे चे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा आयोजन करण्यामागे व्यायामाचे महत्व व जागृती करणे हा हेतू होता. अशी माहिती शैक्षणिक संस्थेच्या सीईओ स्वाती खाडे यांनी दिली. ही स्पर्धा उद्या दि. ०४/०६/२०२३ रोजी मिशन चौक मिरज ते अलदार चौक विश्रामबाग परत मिशन चौक १० किमी तर मिशन चौक मिरज ते भारती हॉस्पिटल मिरज व परत मिशन चौक ५ किमी आशा दोन विभागात घेण्यात आल्या. ही स्पर्धा वय वर्ष १२ ते १८, १८ ते ३५, ३५ ते ५०, ५० व त्यापुढील आशा चार गटात घेण्यात आल्या. असून प्रत्येक गटात महिला व पुरुष प्रथम तीन-तीन क्रमांक काढण्यात आले आहेत. त्यांना ट्रॉफी, सर्टिफिकेट व मेडल देण्यात आले असून, भाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला मेडल व सर्टिफिकेट देण्यात आले आहे. तसेच मार्गावरती रनर्स च्या दृष्टीने हायड्रेशनची व्यवस्था चोख करण्यात आली होती. साधारण ६५० स्पर्धकांनी यामध्ये भाग घेतला होता. त्यामध्ये ५ किमी स्पर्धेत १२ ते १८ वयोगटात पुरुष गटात प्रथम आर्यन चौगुले द्वितीय दर्शन जाधव तृतीय आशुतोष लोखंडे तर महिला गटात प्रथम शुभ्रा ठाणेकर द्वितीय करुणा जाधव तृतीय सुलक्षणी. १८ ते ३५ वयोगटात पुरुष गटात प्रथम नागेश कारंडे द्वितीय राजेश कुंभार तृतीय आशिष गाडे तर महिलांमध्ये प्रथम सोनाली थोरात द्वितीय सुप्रिया कुंभार तृतीय स्मिता ठोकळे. ३५ ते ५० वयोगटात पुरुष गटात प्रथम शरद जाधव द्वितीय बापू धनवडे तृतीय संभाजी काळे तर महिला गटात प्रथम सायली यादव द्वितीय अनिता देसाई तृतीय दीपाली कांबळे. ५० वरील गटात पुरुष प्रथम राज कुंभार द्वितीय पिंकर नाईक तृतीय किशोर माने तर महिलाध्ये वर्षा कुलकर्णी द्वितीय भावना शहा तृतीय वृषाली उदगावकर यांनी क्रमांक मिळवले. तसेच १० किमी स्पर्धेत १२ ते १८ वयोगटात प्रथम अभिषेक सूर्यवंशी द्वितीय यश निर्मळे महिलांमध्ये सायली शितोळे १८ ते ३५ वयोगटात प्रथम विशाल चव्हाण द्वितीय श्रीधर कांबळे तृतीय सागर यमगर महिलांमध्ये प्रथम आकांशा शिंदे द्वितीय कविता पोवार. ३५ ते ५० वयोगटात पुरुषांमध्ये प्रथम जबारसिंग द्वितीय अविनाश शेट्टी तृतीय विपुल पाटील तर महिलांमध्ये प्रथम जिया शेख द्वितीय वैशाली जाधव तृतीय वैशाली माळी. ५० वरील वयोगटात पुरुषांमध्ये प्रथम तुकाराम अनुगडे द्वितीय संजय भगत तर महिलांमध्ये प्रथम सुवर्णा तिवरी यांनी क्रमांक पटकावले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.