प्रतिष्ठा न्यूज

अयोध्येतील अक्षता कलशांचे तासगावात स्वागत…रामभक्तांकडून प्रत्येक घरात अक्षता वाटप होणार

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : थेट अयोध्यातून देशभरामध्ये श्रीराम भक्तांसाठी पाठवण्यात आलेल्या अक्षतांचे रविवारी दुपारी  तासगावात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथे श्रीराम यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.या सोहळ्या दरम्यान वाहण्यात येणाऱ्या अक्षता अयोध्येतून संपूर्ण देशात पोहोचवल्या जाणार आहेत.सांगली येथे शोभायात्रे नंतर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांसाठी अक्षतांचे वाटप करण्यात आले. मिळालेले अक्षता कलश तासगाव तसेच तालुक्यातील रामभक्तांनी मोठ्या उत्साहात दुचाकी रॅली काढत, श्रीरामाचा जयघोष करत शहरामध्ये आणले.दत्तमाळ,गणपती मंदिर, गुरुवार पेठ,शिवतीर्थ,बस स्थानक चौक,वंदे मातरम चौक,सिद्धेश्वर चौक, हटकेश्वर मंदिर मार्गे स्वयंभू मारुती मंदिर पागा गल्ली येथे आणले. यावेळी माता भगिनींनी पारंपारिक पद्धतीने औक्षण करून अक्षता कलशाला नमन केले.अयोध्यातून आलेल्या या अक्षता तासगाव शहरासह तालुक्यात घराघरात पोचतील असे नियोजन करण्यात आले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.