प्रतिष्ठा न्यूज

हिंदु राष्ट्रा’चा आवाज बुलंद करण्यासाठी गडहिंग्लज येथे 10 जानेवारीला हिंदु राष्ट्र-जागृती सभा ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

प्रतिष्ठा न्यूज

गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) : भारताच्या संविधानात प्रस्तावनेत प्रत्येक नागरिकाला समता, बंधुता आणि न्याय मिळेल, असे म्हटले जाते. प्रत्यक्षात आपल्या देशात अल्पसंख्य आयोग, सच्चर आयोग, अल्पसंख्यांक विकास मंत्रालय आहे; मात्र बहुसंख्य हिंदूंना कोणतेही संरक्षण देणारे मंत्रालय-आयोग नाही. देशभरात केवळ हिंदूंच्याच मंदिरांचे सरकारीकरण, तर मशिदी-चर्चचे सरकारीकरण का नाही ? अल्पसंख्याकांना धर्माच्या आधारावर शैक्षणिक अनुदान, मग बहुसंख्य हिंदूंनी काय अपराध केला आहे ? हे सर्व पहाता भारतात खरोखरच ‘सेक्युलर’ व्यवस्था अस्तित्वात आहे का ? हिंदूंच्या हजारो युवतींना उद्ध्वस्त करणारा नवा आतंकवाद म्हणजे ‘लव्ह जिहाद’. भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे संकट ‘हलाल जिहाद’ यांसारख्या हिंदूंवर होणार्‍या अनेक अन्यायांना वाचा फोडण्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी 10 जानेवारी या दिवशी गडहिंग्लज शहरात म.दु. श्रेष्ठी विद्यालय येथे सायंकाळी 6 वाजता हिंदु राष्ट्र जागृती सभा घेण्यात येणार आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. राहुल शिंदे, भाजपचे श्री. संदीप नाथबुवा उपस्थित होते. या सभेला वारकरी संप्रदायाचे श्री. सोमगोंडा देसाई यांना पाठिंबा दर्शवला आहे.

श्री. किरण दुसे पुढे म्हणाले, ‘‘या सभेत सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये, हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये, हिंदु विधीज्ञ परिषदेचे महाराष्ट्र अधिवक्ता संघटक नीलेश सांगोलकर हे वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. या सभेच्या ठिकाणी क्रांतीकारकांविषयी माहिती देणारे फलक, हिंदूंना प्रतीदिन करावयाच्या धर्माचरणाच्या कृती, साधना यांविषयी मार्गदर्शन करणारे फलक प्रदर्शन, तसेच हिंदु जागृती करणार्‍या ग्रंथांचे अन् हिंदूंना धर्मशिक्षण देणार्‍या विविध ग्रंथांचे प्रदर्शनही लावण्यात येणार आहे.

सभेसाठी गडहिंग्लज परिसरातील अनेक गावांमध्ये प्रसार चालू असून गेले महिनाभर विविध तरुण मंडळे, महिलांचे गट, ग्रामस्थ, हिंदुत्वनिष्ठ, लोकप्रतिनिधी यांच्या बैठका घेण्यात येत आहेत. कोपरा बैठका यांसमवेत भित्तीपत्रके, हस्तपत्रके, फलकलेखन, होर्डिंग, सामाजिक संकेतस्थळ यांच्या माध्यमातून व्यापक स्तरावर सभेचा प्रसार चालू आहे. अनेक युवक धर्मरक्षणाच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा प्रदर्शित करत आहेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.