प्रतिष्ठा न्यूज

चिंचोली ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी ब्रह्मजी पाटील जाधव यांची बिनविरोध निवड

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
उमरा प्रतिनिधी : लोहा तालुक्यातील चिंचोली (प उ) येथे दि 6 जानेवारी 2023 रोज शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच- जयश्री मारोती जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येऊन उपसरपंच पदाची निवड करण्यात आली. यात सर्वानुमते उपसरपंचपदी ब्रम्हाजी बालाजी जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
   यावेळी ग्रामपंचायत सदस्य- मिनाक्षी परमेश्वर जाधव, उपाबाई रामराव जाधव, आदींची उपस्थिती होती. उपसरपंच पदासाठी ब्रम्हाजी जाधव यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निरीक्षक गायकवाड यांनी जाहीर केले. या निवड कामी ग्रामसेवक- मधुकर पाटील, यानी सहकार्य केले. यावेळी पॅनेल प्रमुख माजी सरपंच- माधव पाटील जाधव, कैलास पाटील, तंटामुक्तीचे- अशोक जाधव, प्रकाश पाटील, रघुनाथ जाधव, मठलवाड लक्ष्मण, आदी ग्रामस्थांची उपस्थिती होती.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.