प्रतिष्ठा न्यूज

उमरा- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिमला तांडा येथे अनिवासी वस्तीगृहाचे उद्घाटन संपन्न

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
उमरा प्रतिनिधी : लोहा तालुक्यातील सुगाव संकुलातील भिमला तांडा उमरा येथील जिल्हा प्राथमिक शाळेत नुकतेच ऊस तोडणी व इतर कामासाठी स्थलांतर झालेल्या मजुरांच्या मुलांसाठी हंगामी अनिवासी वस्तीगृहाचा उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सुगाव संकुलाचे केंद्रप्रमुख तथा केंद्रीय मुख्याध्यापक बी.जी. कापसे महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष जी.एस.मंगनाळे, अखिल शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा शिक्षक पतपेढीचे संचालक अशोक पाटील मारतळेकर, गटसाधन केंद्राचे गटसमन्वयक रामदास कस्तुरे, बाळू चव्हाण, एम.डी. सिरसाट, बालाजी ढाले, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष- गुलाब जाधव, उपाध्यक्ष- पंडित राठोड, तांड्यातील ज्येष्ठ नागरिक शंकर राठोड, शेषराव पो.पा. वसंत जाधव, गोविंद महाराज, रघुनाथ पवार, नामदेव पवार, भीमराव पाटील घोरबांड, कलीम शेख, माधव राठोड, नारायण चव्हाण, बालाजी शिंदे, आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सय्यद सर यांनी केले, तर सूत्रसंचलन मनोहर शीतळे, यांनी केले, तर आभार प्रदर्शन राहुल कुंडलवाडीकर यांनी मानले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.