प्रतिष्ठा न्यूज

डॉ.सुनील कुलकर्णी यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड

प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
मिरज : असोसिएशन ऑफ  ऑस्टिओसिंथेसिस या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या  भारतीय राष्ट्रीय अध्यक्ष २३-२४ म्हणून मिरजेतील डॉ. सुनील कुलकर्णी यांची निवड झाली आहे. ऑर्थोपेडिक मधील नवनवीन तंत्रज्ञान यात निष्णातपणा आणणे हा या  संघटनेचा मुख्य उद्देश आहे. संघटना जगभरामध्ये ऑर्थोपेडिक मधील नव नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी व त्याचे प्रशिक्षण देण्यासाठी विविध शस्त्रक्रिया शिकवण्यासाठी विविध कार्यशाळा चे आयोजन करते. नवीन व तरुण शैल्य चिकित्सकांना प्रशिक्षण देणारी ही एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. जगातील प्रत्येक देश या संघटनेचे सदस्य आहेत. भारतात या संघटनेचे दहा सदस्य असून भारताच्या पाच भागातून प्रत्येकी दोन याप्रमाणे त्यांची निवड झालेली असते. यापूर्वी सदस्य असलेले मिरजेचे डॉ. सुनील कुलकर्णी जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज अंतर्गत जी एस कुलकर्णी हॉस्पिटल मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट चालवतात त्यांची १ जुलै २०२३ रोजी  भारताचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.