प्रतिष्ठा न्यूज

नांदेड जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस: शेतकरी वर्गात समाधान; पेरणीसाठी सज्ज

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार
नांदेड : जिल्ह्यातील कंधार,मुखेड तालुक्यासह,नांदेड शहर,परिसरात मुसळधार पाऊस पडला.त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या 1 महिन्यापासून जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हुलकावणी दिल्याने पेरणी खोळंबली होती.  शेतकरी राजा पावसाची वाट पाहत होता. चिंता निर्माण झाली होती.मात्र आज
    दि.4 जूलै रोजी सायंकाळी मुखेड,कंधार तालुक्यात सायंकाळी जोरदार पाऊस पडला आहे.कंधार तालुक्यातील पेठवडज,जाकापूर,गोणार, शिरसी,येलूर,मसलगा,मादाळी,नारनाळी ,कौठा,बारूळ, शिरूर,चौकी महाकाय,धानोरा,तेलूर,रहाटी,   आदी गावात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे शेतकरी कापूस लागवड करणे,सोयाबीन, ज्वारी  पेरणीसाठी सज्ज झाला आहे. तसेच नांदेड शहरात,परिसरात रात्री 8: 30 वाजता पाऊस पडला. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.