प्रतिष्ठा न्यूज

कर्मवीर पतसंस्था व कर्मवीर ट्रस्ट चे २०२३-२४ चे “कर्मवीर भूषण पुरस्कार” जाहीर; पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण : रावसाहेब जिनगोंडा पाटील

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित., सांगली या संस्थेची स्थापना कर्मवीर जयंत सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त १२ मार्च १९८७ रोजी स्व. डॉ. आप्पासाहेब चोपडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. सांगली कोल्हापूर, सातारा जिल्हयात एक विश्वासार्ह पतसंस्था म्हणुन ही संस्था जनमानसात पुढे आली आहे. या संस्थेस सामाजिक आर्थिक क्षेत्रात चांगल्या कार्याबद्दल अठरा वेळा आदर्श पतसंस्था म्हणुन पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

कर्मवीर आण्णांची जयंती संस्थेच्या वतीने व कर्मवीर चॅरीटेबल ट्रस्ट च्या वतीने दरवर्षी निरनिराळया सामाजिक उपक्रमानी साजरी केली जाते यावर्षीही संस्थेने समाजातील निरनिराळया क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना कर्मवीर भूषण पुरस्कार देऊन गौरविणार असलेचे जाहीर करुन त्या पुरस्कारांची घोषणा संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील व कर्मवीर चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मा. ओ. के. चौगुले (नाना) यांनी केली. या वर्षीचा

१) कर्मवीर कृषिभूषण पुरस्कार मा. डॉ. आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, संस्थापक शरद शैक्षणिक व उद्योग समुह २) कर्मवीर विद्याभूषण पुरस्कार मा.डॉ.प्रा. डी.डी. चौगुले संस्थापक, डॉ. शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसी. क. डिग्रज

३ ) कर्मवीर उद्योगभूषण पुरस्कार मा.श्री. योगेश लक्ष्मण राजहंस, सुप्रसिध्द उद्योजक, सांगली, यांना देण्याचे जाहीर केले आहे. पुरस्काराचे स्वरूप शॉल, श्रीफळ, मानचिन्ह व रोख रुपये ५१०००/- असे आहे. अशी माहिती मा. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी दिली.

हे पुरस्कार जेष्ठ अणूशास्त्रज्ञ भारतीय अणुउर्जा महामंडळाचे माजी अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या शुभहस्ते व भारती अभिमत विद्यापीठ पुणे चे कुलपति मा. प्रा.डॉ. शिवाजीराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमास टेक्नोलॉजी ट्रान्सफर अॅण्ड कोलॅब्रेशन बीएआरसी चे माजी प्रमुख डॉ. अजित एम. पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. हा सोहळा रविवार दिनांक २२ सप्टेबर २०२४ रोजी दुपारी ३ 00 वाजता ऐश्वर्य मल्टीपर्पज हॉल, धामणी फळ मार्केट रोड, ए. बी. पाटील इंग्लिश स्कुल जवळ इ. धामणी येथे संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमानिमित्त हॉल च्या ग्राऊंडवर विविध कॉलेजेस च्या वतीने मॉडल प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे या सर्व कार्यक्रमामध्ये शाळा व कॉलेजनी सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळ्याचे यु ट्युब व फेसबुक लाईव्ह व केबल टी व्ही प्रक्षेपण होणार आहे.

संस्थेने आर्थिक कार्याबरोबरच सामाजिक कार्यातही सतत भरीव योगदान दिले आहे. दरवर्षी विद्यार्थ्यांचा सत्कार, गुणिजनांचा सत्कार, रक्तदान शिबीर असे कार्यक्रम संस्थेने राबविले आहेत. तसेच विद्यार्थी, खेळाडू, अनाथाश्रम, वृध्दाश्रम यांना मदत, अपंग पुनर्वसन व वृक्षारोपन, व्याख्यांनाचे आयोजन यासाठी संस्थेने नेहमी मोलाची मदत केली नैसर्गिक आपत्ती वेळी कर्मवीर पतसंस्था व कर्मवीर चॅरीटेबल ट्रस्ट ने सढळ हाताने मदत केली आहे.

संस्थेचे कार्यक्षेत्र सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्हा असून विश्वासार्ह व नावाजलेल्या संस्थेमध्ये या संस्थेची गणना होते. संस्थेच्या एकूण ठेवी ११४५ कोटी आहेत. संस्थेने रु. ८४५ कोटीचे कर्ज वाटप केले आहे. संस्थेचे वसुल भांडवल ३८ कोटी ५० लाख असून संस्थेचा स्वनिधी रु. ११५ कोटी २६ लाख इतका आहे. संस्था भक्कम आर्थिक पायावर उभी असून संस्थेने ३९८ कोटी ४७ लाख इतकी सुरक्षित गुंतवणुक केली आहे. संस्थेस सतत ऑडीट वर्ग अ आहे. सभासदांच्या हितासाठी संस्थेने ठेवी कर्जाच्या विविध योजना संस्थेने राबविल्या आहेत.

संस्था सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात ६४ शाखांच्या माध्यमातुन कार्यरत आहे. सर्व शाखा ऑनलाईन कोअर बँकींग ने जोडलेल्या आहेत. संस्थेत SMS बँकींग, RTGS / NEFT/IMPS व लॉकर सुविधा इ. सुविधा देण्यात येत आहेत. आर्थिक क्षेत्रात एक विश्वासार्ह व नावाजलेली संस्था म्हणून कर्मवीर संस्था अग्रक्रमाने काम करीत आहे.

यावेळी कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट चे कार्यवाह व तज्ञ संचालक श्री. लालासो भाऊसो थोटे संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉ. अशोक आण्णा सकळे, संचालक अॅड. एस. पी. मगदुम, डॉ. रमेश वसंतराव ढबू, श्री. वसंतराव धुळाप्पाण्णा नवले. डॉ. एस.बी. पाटील (मोटके) डॉ. चेतन आप्पासो पाटील संचालिका श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे, सौ चंदन नरेंद्र केटकाळे, तज्ञ संचालक डॉ. नरेंद्र आनंदा खाडे, व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल श्रीपाल मगदुम आदी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.