प्रतिष्ठा न्यूज

जाकापूर येथे ग्रामपंचायतच्या वतीने तिरंगा ध्वजाचे मोफत वाटप

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार
नांदेड दि. 8 : ग्रामपंचायत कार्यालय जाकापूर ता कंधार येथे ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच प्रतिनिधी तथा सामाजिक कार्यकर्ते श्री गोपाळ जाधव यांचे हस्ते तिरंगा ध्वजाचे मोफत वाटप करण्यात आले. गावात एकूण जवळ जवळ 100 घरे असून 75 व्या स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त 75 तिरंगा ध्वजाचे आज दि.8 जुलै रोजी मोफत वाटप करण्यात आले.आणि उर्वरित नागरीकांनी मागणी केल्यास आपण मोफत तिरंगा ध्वज उपलब्ध करून देऊ असे त्यांनी सांगितले.
सर्व गावकऱ्यांना आव्हान करण्यात येते की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त शासनाच्या उपक्रमा नुसार “हर घर तिरंगा”या मोहिमे अंतर्गत प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर दि.13/8/2022 ते 15/8/2022या कालावधीत तिरंगा धवज उत्साने फडकावयाचे आहे.आपल्या ला ही योगायोगाने संधी मिळाली आहे. तेव्हा सर्व नागरीकांनी मोठ्या आनंदाने आप- आपल्या घरी तिरंगा ध्वज फडकवावे असे आवाहन सरपंच प्रतिनिधी श्री गोपाळ पा. जाधव, उपसरपंच प्रतिनिधी श्री माधवराव पा. पवार , ग्राम पंचायत सदस्य श्री श्रीराम पा. शिरसे , ग्राम पंचायत तंत्रसाहाय्क हणमंत पा. शिरसे यांनी केले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.