प्रतिष्ठा न्यूज

सांगलीत दि.9 ऑगस्ट रोजी राजा विक्रमादित्य या दीर्घांकाचे आयोजन

प्रतिष्ठा न्यूज / मिलिंद चितळे
सांगली : आद्यनाटककार विष्णुदास भावे यांचा स्मृतीदिन दि.9 ऑगस्ट रोजी आहे. सांगलीच्या विष्णुदास भावे नाट्य मंदिरात या दिवसाचं औचित्य साधून, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा सांगली यांचेवतीने राजा विक्रमादित्य या दीर्घांकाचे आयोजन केलेले आहे. ललित कला व नाट्यतंत्र कला महाविद्यालय शांतीनिकेतन, सांगली या संस्थेचे कलाकार ही कलाकृती सादर करणार आहेत.
एकूण 22 कलाकारांचा समावेश असलेल्या या कलाकृतीत गण, बतावणी, वग, भजन, शाहिरी पोवाडा अशा लोककलांचा समावेश आहे. याचं लेखन केलं आहे श्री.राजेंद्र पोळ यांनी तर श्री.प्रशांत जगताप यांचं दिग्दर्शन लाभलेलं आहे. मंगळवार दि. 9 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 4.30 वाजता सादर होणार्‍या या कार्यक्रमांला रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, प्रमुख कार्यवाह. सनित कुलकर्णी आणि कार्यक्रम प्रमुख भालचंद्र चितळे यांनी केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.