प्रतिष्ठा न्यूज

नांदेड जिल्ह्यासाठी ऑरेंज (Orange) अलर्ट: नांदेड उपजिल्हाधिकारी

प्रतिष्ठा न्युज /वसंत सिरसाट
नांदेड : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दि.27 एप्रिल 2023 रोजी दुपारी 1-00 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दि. 27 व 28 एप्रिल 2023 हे 2 दिवस एप्रिल 2023 या 2 दिवसांच्या काळात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे वाहण्याची व विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह गारपीट होण्याची शक्यता वर्तविली आहे. तसेच दि.29 व 30 एप्रिल व दि.1 मे 2023 या 3 दिवसांच्या काळात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची व विजेच्या कडकडाटासह – ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. तेंव्हा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून खालील प्रमाणे काळजी घ्यावी. असे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

●या गोष्टी करा●
1) विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा, 2) आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या.घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. 3) आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. 4) तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. 5) पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

●या गोष्टी करू नका●
1) आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लंडलाइन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तमेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. 2) विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तन्मध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. 3) उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. 4) धातूच्या उंच मनोज्याजवळ उभे टाकू नका. 5) जर आपण घरात असाल तर उबड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.
असे आवाहन मा. संतोषी देवकुळे- निवासी उपजिल्हाधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.