प्रतिष्ठा न्यूज

राजर्षी शाहू विद्यालय,ज्यु.काॅलेज मध्ये संविधान दिन उत्साहाने साजरा

प्रतिष्ठा न्युज
नांदेड जिल्हा प्रतिनिधी : शहरातील राजर्षी शाहू विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला .यावेळी संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस शाळेचे मुख्याध्यापक श्री बालाजी हंगरगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सर्व उपस्थित शिक्षकांनी भारतरत्न डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
तसेच यावेळी शाळेतील सहशिक्षक श्री बालाजी गर्जे यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले आणि उपस्थित शिक्षकांनी संविधानाची शपथ घेतली. याप्रसंगी पर्यवेक्षक सावंत, शाळेतील सांस्कृतिक विभाग प्रमुख शिवानंद टापरे ,आनंद मोरे ,पंढरी मुसळे , बालाजी गर्जे, राजू पवार, तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी श्रीमती मथुराबाई घोडेकर, श्रीमती लक्ष्मीबाई जाधव आदिजण उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.