प्रतिष्ठा न्यूज

जुळेवाडीच्या सरपंचास ग्रामसभेत मारहाण; डी पी आय काढणार निषेध मोर्चा

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:जुळेवाडी ता.तासगांव येथील मागासवर्गीय मातंग समाजाचे सरपंच नितीन राजेंद्र आवळे हे गावचे सरपंच झाल्यापासून त्याच गावाचे उपसरंपच विजय आप्पा खोत हे जातीय द्वेशापोटी वेगवेगळ्या मार्गाने मागासवर्गीय सरपंचास त्रास देत आहेत,सरपंचांच्या विरोधात जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे खोटया तक्रारी करणे,मिटींग चालू असताना जातीचा उल्लेख करुन घालून पाडून बोलणे,खुनाची धमकी देणे,गुंडांच्या करवे सरंपचास मारहाण करणे इ प्रकारे त्रास देत आहेत.बुधवार दि. २२/११/२०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता ग्रामपंचायत समोर हनुमान मंदीर स्टेजवर जनरल ग्रामसभा सुरु असताना सरंपच नितीन आवळे, उपसरंपच विजय आप्पा खोत इ. सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. सभेत लक्ष्मी मंदीर ट्रस्ट करणे व त्या अनुषंगाने लागणारे ठराव घेणे हा विषय घेण्यात आला होता.या ठरावाच्या अनुषंगाने चर्चा सुरु असताना महादेव मानुगडे या ग्रामस्थाने माझी पण ट्रस्ट मध्ये नाव घ्या असे मत मांडले या त्यांच्या मताला सरपंच नितीन राजेंद्र आवळे यांनी असे मत मांडले की मागील ऑगस्ट महिन्यात झालेल्या ग्रामसभेत लक्ष्मी मंदीर विषयी चर्चा झालेली होती त्या मिटींग मध्ये तुम्ही स्वतः हजर होता त्यावेळी बहुमताने ठराव पास झालेला होता त्यावळी तुम्ही तुमच्या नावाची चर्चा माझे नाव घ्या म्हणून का केली नव्हती असे म्हणत, स्टेजवर खाली बसलेले संदेश बबन जाधव,विजय आप्पा खोत,गणेश जगन्नाथ फडतरे,पवन बळीराम जाधव,श्रेयस चंद्रकांत खोत,रविराज सदाशिव ऊर्फ भूई जाधव व सुभाष शंकर जाधव यांनी या मांगाच काय
ऐकायचे म्हणून सरपंच नितीन राजेंद्र आवळे यांना जातीवाचक शिवीगाळ करुन लाथा बुक्यांनी मारहाण करुन जखमी केले.सरपंच यांची पत्नी मध्ये भांडणे सोडवणेस गेली असता त्या माऊलीला त्या जातीयवादयांनी तिच्या केसाला धरुन लाथा बुक्यांनी मारहाण केली व त्या मांगणीला लई मस्ती आहे असे बोलत जातीवाचक शिवीगाळ केली.अशा या जातीयवादी गावगुंडाच्या निषेधार्थ डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने प्रा. सुकूमार कांबळे संस्थापक अध्यक्ष डिपीआय यांच्या मार्गदर्शनाखाली व डिपीआयचे जमीन झोपडी हक्क अभियान राज्य प्रमुख अशोकराव वायदंडे,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतिश लोंढे,जिल्हाध्यक्ष प्रशांत आवळे, पश्चिम महाराष्ट्र नेते भास्कर सदाकळे, जिल्हा सल्लागार गोरखनाथ सदाकळे,जिल्हा नेते संदीप काटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मोर्चा गुरुवार दि. ३०/११/२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते शिवाजी पुतळा मार्ग तासगांव तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.