प्रतिष्ठा न्यूज

युवती सक्षमीकरणासाठी बीजेएसच्या ‘ट्रेनर्स ट्रेनिंग’ कार्यक्रमाची नितांत आवश्यकता डॉ.लताताई देशपांडे

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : भारतीय जैन संघटना सांगली जिल्हा शाखेमार्फत ‘स्मार्ट गर्ल’ (युवती सक्षमीकरण) ५५ प्रशिक्षकांचे प्रशिक्षण, ५ व ६ ऑगस्ट 2023 रोजी राजमती भवन, नेमिनाथनगर, सांगली येथे संपन्न झाले. त्याच्या समारोप समारंभ प्रसंगी दर्जेदार स्त्री शिक्षणासाठी काम करित असलेल्या वुमेन्स एज्युकेशन सोसायटी, सांगलीच्या अध्यक्षा डॉ. श्रीमती लताताई देशपांडे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
त्यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. लताताई देशपांडे म्हणाले की, स्वयंसेवी संस्था, भारतीय जैन संघटना स्त्री उन्नतीच्या दृष्टीने करित असलेल्या अद्वितीय कार्याची मुक्तकंठाने स्तुती करून, सांगलीतील त्यांच्या सर्व संस्था मधील मुलींसाठी युवती सक्षमीकरण कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्याचे आश्वासन देऊन. राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अशा प्रकारे उत्कृष्ट आयोजन केलेल्या प्रशिक्षण कार्याच्या भावी वाटचालीसाठी सहकार्याचे आश्वासन दिले.
या समारोप प्रसंगी बीजेएस चे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी अध्यक्षपदाचे मनोगत व्यक्त करताना, सांगली जिल्हा बीजेएस मार्फत येत्या वर्षभरात १० हजार मुलींचे सक्षमीकरण करण्याची, महत्त्वाकांक्षी योजना जाहीर करून, सर्व प्रशिक्षित प्रशिक्षकांना ही जबाबदारी पार पाडण्यास सहकार्य करावे असे आवाहन केले. त्यास सर्व प्रशिक्षणार्थीनी उत्स्फूर्तपणे, आनंदाने प्रतिसाद दिला.
यावेळी मास्टर ट्रेनर म्हणून सर्वोत्कृष्ट भूमिका बजावलेल्या दीपक पाटील व सुवर्णा कटारे या उभयतांचा व बीजेएस चे निरीक्षक सीमा शिंदे यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार व सन्मान करण्यात आला. यावेळी प्रशिक्षणार्थी चे प्रतिनिधी म्हणून शबनम इनामदार, डॉ. सुनिता माळी, सुनीता चौगुले यांनी प्रभावी प्रशिक्षणाबद्दल अत्यंत समाधान व्यक्त करून, युवती सक्षमीकरणाचे कार्य सक्षमपणे करण्याची प्रतिज्ञा घेतली.
सदर समारोप प्रसंगी स्वागत व प्रास्ताविक बीजेएस सांगली जिल्हा अध्यक्ष धन्यकुमार शेट्टी यांनी केले. आभार आशालता गर्ल्स हायस्कूलचे पर्यवेक्षक अनिल चौगुले यांनी केले तर सूत्रसंचालन रविंद्र पाटील यांनी केले. यावेळी मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयाचे प्राचार्य आर.जी. कुलकर्णी, बीजेएस चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष वृषभजी छाजेड, सचिव प्रवीणजी पारख, राज्य कार्यकारणी सदस्य राजगोंडा पाटील, सांगली जिल्हा बीजेएस उपाध्यक्ष आण्णासाहेब उपाध्ये, सचिव वसंतराव पाटील, सहसचिव रविंद्र पाटील, अन्य सदस्य अविनाश चौगुले, सुभाष देसाई, अशोक वंजाळे व २५ शाळा महाविद्यालयातून आलेले ५५ प्रशिक्षक प्रशिक्षणार्थी, अॅड. अभिजीत नाडगे, सुनीता शेडबाळे इत्यादि उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.