प्रतिष्ठा न्यूज

आमदार संजय गायकवाड यांचा सांगली जिल्हा महिला काँग्रेसकडून निषेध

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : राहुल गांधी यांच्या विरोधात अभद्र बोलणारे आमदार संजय गायकवाड यांच्या निषेधार्थ आज सांगली जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने निषेध व्यक्त करून त्यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले. अखिल भारतीय काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी यांच्या विरोधात एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी अभद्र व अर्वाच्य शब्दात बोलून टीका केली होती. अशा या वाचाळवीर, बेभान सुटलेल्या आमदारा विरोधात आज सांगली जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने संजय गायकवाड यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसचे उपाध्यक्ष शैलजाभाभी पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा निषेध व्यक्त करण्यात आला. भारत देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या गांधी परिवाराबद्दल कोणीही अभद्र व अर्वाच्य बोलू नये. संपूर्ण भारत देशाच्या निर्मितीसाठी गांधी परिवारची मोठी योगदान आहे. अशा परिवारातील व देशातील प्रमुख जबाबदार व्यक्ती श्री. राहुलजी गांधी यांच्या बाबत बोलणारे संजय गायकवाड यांना जनता धडा शिकवेल अशी प्रतिक्रिया शैलजाभाभी पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी सांगली शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा करुणा सॅमसन, जिजाऊ ब्रिगेड महिला मंडळाच्या आशा पाटील, माजी सरपंच कविता बोंद्रे, माजी सरपंच शोभा चव्हाण, माजी नगरसेविका शुभांगी साळुंखे , कविता नागे, अनुराधा पाटील, शुभांगी कांबळे,आरती गुरव, शमशादबी नायकवडी, शोभा विधाते, एस्तर कोनेसागर, सुमन कांबळे आदी महिला पदाधिकारी, भगिनी उपस्थित होत्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.