प्रतिष्ठा न्यूज

राज्यात एनडीआरएफ व एसडीआरएफच्या 14 तुकड्या तैनात

प्रतिष्ठा न्यूज
मुंबई, दि.२ : राज्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबई (कांजूरमार्ग-१, घाटकोपर-१) -२, पालघर -१,रायगड- महाड- २, ठाणे-२,रत्नागिरी-चिपळूण-२,कोल्हापूर-२,सातारा-१,  या ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) एकूण १२ पथके तैनात आहेत.
नांदेड-१, गडचिरोली-१ अशा राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) एकूण दोन तुकड्या तैनात केलेल्या आहेत.
राज्यातील नुकसानाची सद्यस्थिती
राज्यात १ जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे  २८ जिल्हे व ३१३ गावे प्रभावित झाली आहेत. ८३ तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली असून १४ हजार ४८० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे ११० नगरिकांनी  आपला जीव गमावला आहे तर २१८ प्राणी दगावले आहेत.४४ घरांचे पूर्णत: तर २ हजार ०८६ घरांचे अंशत: नुकसान झालेले आहे.
राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाकडून आज  सकाळी ११ वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार हा अहवाल प्रसिद्धीसाठी देण्यात  येत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.