प्रतिष्ठा न्यूज

प्रेरणा फाऊंडेशन चा पाचवा वर्धापन दिन व पुरस्कार वितरण समारंभ धुमधडाक्यात साजरा

प्रतिष्ठा न्यूज
कल्याण : प्रेरणा फाउंडेशन ठाणे /महाराष्ट्र या सामाजिक संस्थेचा चा पाचवा वर्धापन दिन २५ मार्च २०२३ रोजी कल्याण मधील आचार्य प्र.के.अत्रे रंगमंदिर या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन संस्थापिका अध्यक्षा दीप्ती उर्फ प्रेरणा (गावकर) कुलकर्णी, यांनी केले.
यावेळी सामाजिक स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करण्यात आलेल्या सर्व मान्यवरांना पुरस्कार , ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला
यावेळी मंचावर प्रमुख उपस्थिती मा डॉ चिंतामण म्हात्रे (दिनदयाल कुष्ठरोग संस्था संस्थाप/अध्यक्ष ), मा.श्री जादूगर अभिजीत (जादुई दुनिया,अभिनेते), मा श्री संजीव जैन (integreon cheif information officer ), मा श्री अविनाश म्हात्रे दिनदयाल कुष्ठरोग संस्था सचिव) ,मा श्री विकास परब (प्रमुख मुंबई अग्निशामकदल फायर ब्रिगेड लिडिंग फारमॅन), मा सौ अनिशा फणसळकर (अमोदीनी संस्था संस्थापक/ अध्यक्ष , मॅरेज आणि चाईल्ड कौन्सिलर ), मा रघुनाथ फडके (मुंबई आकाशवाणी केंद्र , जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य,प्रसिद्ध गायक ), मा गुरुनाथ तिरपणकर ( जनजागृती सेवा समितीसंस्थाप/अध्यक्ष),मा रामजीत गुप्ता (मुख्य तपासी अधिकारी , अँटीपायरसी सेल मुंबई) प्रामुख्याने उपस्थित होते तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संस्थाचे समाजसेवक उपथित होते .
या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता प्रेरणा फाउंडेशन संस्थापिका दीप्ती उर्फ प्रेरणा गावकर कुलकर्णी यांना विशेष सहकार्य सहकार्य,सचिव वैभव गोविंद कुलकर्णी,उपखजिनदार दिव्या गावकर, व सभासद रोहन गावकर यांचे लाभले उपसचिव दिलेश देसाई, सभासद सौ. वैशाली चांदेकर, सभासद , सौ हेमा सुतार , ऋषिकेश देसाई ,गौरव गोपाळ कुलकर्णी व नरेंद्र कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले . सौ वैष्णवी पाटील, शुभ्रा तिळगुळकर ,मधु पाटोळे कार्तिकी सुतार. अर्चना शिंगाडे,दर्शन शिंगाडे यांनी या नृत्यांगनांनी सूंदर असे नृत्य सादर करून कार्यक्रमात प्रेक्षकांची मने जिकंली तसेच दिव्या गावकर व श्री.संजीव सुरेशचंद्र जैन यांनी गायन करून प्रेक्षकांची मने जिंकली. मंचावर उपस्थित मान्यवरांनी प्रेरणा फाउंडेशन अध्यक्ष दीप्ती उर्फ प्रेरणा (गावकर) कुलकर्णी कार्याचे कौतुक केले व मान्यवरांनी सर्वांना मार्गदर्शन केले .
या कार्यक्रमाला कल्याण मधील आचार्य प्र. के. अत्रे रंगमंदिर या ठिकाणी 300 अधिक सभासद सदस्य व समाजसेवक तसेच नागरिक यांनी हजेरी लावून या कार्यक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद दिला आलेल्या सर्व मान्यवरांचे दीप्ती उर्फ़ प्रेरणा (गावकर) कुलकर्णी यांनी आभार व्यक्त केले. व अल्पोउपहराने कार्यक्रमाची सांगता झाली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.