प्रतिष्ठा न्यूज

रविवारी तासगांव येथे एम एम ग्रुपचा १०वा वर्धापन दिन

समाजाच्या उन्नतीसाठी हजारोंच्या संख्येने रामोशी बांधवानी एकत्र येण्याचे आवाहन

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : “पिढ्यानपिढ्या डोंगर कपारीत राहणाऱ्या रामोशी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गेली १० वर्षे MM नावाचा झंझावात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घोंघावतो आहे.राम वंशी असलेल्या तमाम रामोशी बांधवांचे अस्तित्त्व आणि अस्मिता मान्य करायला लावताना इथल्या व्यवस्थेला गुडघ्यावर आणायची तयारी एम एम कडे निश्चितपणे आहे,याच एमएम ग्रुप चे वर्धापन दिन आजवर राज्यभर हजारो रामोशी बांधवांच्या उपस्थितीत केले झाले आहेत.अशा कार्यक्रमांचे औचित्य साधून त्या त्या ठिकाणच्या राज्यकर्त्यांना सुध्दा आमंत्रित करायचे आणि आम्हा विस्थापितांच्या व्यथा त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या हा यापाठीमागचा एकमेव उद्देश आहे. येत्या रविवारी ६ नोव्हेंबर २०२२ रोजी एम एम ग्रुपचा १० वा वर्धापन दिन तासगांव मध्ये होत आहे.MM ग्रुपचे संस्थापक,बहुजन ह्रदयसम्राट मोहन मदने (एम एम) नाना यांची बुलंद तोफ या मेळाव्यात धडाडणार आहे.यावेळी ते समाज बांधवाना मार्गदर्शन करून समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ग्रुपच्या माध्यमातून केलेली कामे यासंबंधि माहिती देणार आहेत, तरी या मेळाव्यासाठी रामोशी बांधवांसोबत सर्व बहुजन समाजाने हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा” असे आवाहन एम एम ग्रुप चे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष अंकुशराव मंडले यांनी केले आहे.यावेळी,आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मंडले म्हणाले की, “रामोशी समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी आम्ही एम एम नानांच्या खांद्याला खांदा लावून गेली दहा वर्षे काम करतो आहे.वर्षभरातील कामाचे चिंतन,आत्मपरीक्षण आणि आमची गाऱ्हाणी व्यवस्थेपुढे मांडणे या प्रामाणिक हेतूने आम्ही वर्धापन दिनाचे आयोजन करतो.यावर्षी एम एम ग्रुपचा हा १० वा वर्धापन दिन असून तो तासगांवच्या दत्त माळ येथील भव्य मैदानावर हजारो रामोशी बांधवांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अध्यक्ष म्हणून सांगली लोकसभेचे खासदार संजय काका पाटील हे असून आमदार गोपीचंद पडळकर,प्रा.नितीन बानुगडे पाटील,आमदार सुमनताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याशिवाय,आमदार अनिल बाबर, आमदार अरुण अण्णा लाड,रोहित पाटील,अविनाश काका पाटील, जि.प.अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, दिलीप तात्या पाटील,वैभव दादा पाटील,राहुल महाडिक,प्रभाकर पाटील,प्रमोद शेंडगे, प्रा.सुकुमार कांबळे,राजीव मोरे,रोहिणी शिरतोडे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी एम एम ग्रुप चे प्रदेशाध्यक्ष धनाजी जाधव, सांगली जिल्हाध्यक्ष सतीश यलमार,नगरसेवक विमीत शिरतोडे,नंदू मंडले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.