प्रतिष्ठा न्यूज

उमरा येथे- 7 ते 12 ऑगस्ट दरम्यान “श्रीमद भागवत कथा” कार्यक्रमाचे आयोजन

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा : लोहा तालुक्यातील उमरा येथे अधिक मासा निमित्त दि.7 ते 12 ऑगस्ट दरम्यान “श्रीमद भागवत कथा” ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
अधिक श्रावण कृ.7 सोमवार ते कृ.12 रविवार पर्यंत  कथाकार ह.भ.प.सौ.सुनिताताई वडजे उमरेकर यांचे दि. 7 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट 2023 दरम्यान रोज सायंकाळी- 7 ते 10 व दि.13 ऑगस्ट रोजी सकाळी- 7 ते 10 या वेळात “श्रीमद भागवत कथा” कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमाचे मुख्य यजमान श्री मनोहर दत्तराम पाटील सिरसाट  व सौ. सगुणाबाई मनोहर पाटील सिरसाट हे असून यावेळी गायक – रावसाहेब पाटील शिंदे, तबला वादक – अक्षय महाराज काकांडीकर, ऑरगण वादक – बाळगीर महाराज, हे उपस्थित राहणार आहेत.
तसेच संहिता पारायण सकाळी- 7 ते 10 आणि कथा निरुपण सायंकाळी- 7 ते 10 या वेळात होणार आहे.
कथास्थळ – हनुमान मंदिर,
तरी या कार्यक्रमाचा उमरा परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक:-  एम.डी. सिरसाट (गुरुजी) व समस्त गावकरी मंडळी, उमरा, यांनी केले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.