प्रतिष्ठा न्यूज

एन.सी.सी.बटालियन 52 चे सुभेदार जितेंद्रपाल नायक यांचा सत्कार : राजर्षी शाहू विद्यालयात लो.टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार
नांदेड : राजर्षी शाहू विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, राजर्षी शाहू बालक मंदिर, कस्तुरबा गांधी विद्यालय येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी एन.सि.सी.बटालियन52 जितेंद्रपाल नायक यांचा शाळेच्या वतीने गौरव करण्यात येऊन लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती दि.1 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली .
यावेळी या थोर नेत्यांच्या प्रतिमेस शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री बी. एम .हंगरगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शाळेतील सर्व कर्मचारी यांनी प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री पी .एम. सावंत यांनी आपले विचार व्यक्त केले.
तसेच यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री हंगरगे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी शाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. यावेळी शाळेतील विद्यार्थी फौजिया पठाण, कु.प्रतीक्षा बोडके, अभय इंगळे, ओम पाटील , कु.स्वरा साबळे,कु. पूजा शिंदे ,मयुरेश राणे कु. जान्हवी उकरंडे,कु. निशा सोनकांबळे ,कु.पूनम कांडले ओमकार कुलकंटे,कु. प्रतीक्षा मुंगळे ,ऋषिकेश नवले , कु. पल्लवी पाबळे आदी विद्यार्थ्यांनी भाषणे केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कृतिक विभाग प्रमुख श्री शिवानंद टापरे यांनी केले.तर आभार एन.सी.सी. विभाग प्रमुख डॉ.एम.एम.गाडेकर यांनी व्यक्त केले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.