प्रतिष्ठा न्यूज

तासगावच्या ‘कस्तुरबा हॉस्पिटल’ साठी प्रभाकर बाबा पाटील यांचा पाठपुरावा…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगावच्या कस्तुरबा मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल साठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज यांचे अखत्यारीत कार्यान्वित करणेसंदर्भात व त्याकरिता लागणाऱ्याा अतिरिक्त पदमान्यते संदर्भात मिरज वैद्यकीय महाविद्यालय,तासगाव नगरपरिषद व खासदार संजय काका पाटील यांचे उपस्थितीत लवकरच बैठक होणार आहे.वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी खासदार पाटील यांनी या संदर्भात चर्चा केली आहे.नुकतीच तासगाव कवठेमंकाळ विधानसभा निवडणूक प्रमुख    प्रभाकर बाबा पाटील यांनी पालिकेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांची भेट घेऊन हॉस्पिटल सुरु करण्याबाबत चर्चा केली होती. याबाबत  माहिती देताना प्रभाकर बाबा म्हणाले तासगांव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज अंतर्गत आरोग्य शिक्षण पथकाचे कस्तुरबा मॅटरनिटी होम आणि बाहयरुग्ण कक्ष कार्यरत होते.कस्तुरबा मॅटरनिटी होम या बाळंतपणाच्या दवाखान्याची इमारत जीर्ण झालेली असल्याने तेथे सन 2017-18 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून तासगांव नगरपरिषदे मार्फत वैशिष्टयपूर्ण योजने अंतर्गत अद्ययावत “कस्तुरबा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल” इमारत बांधण्यात आलेली आहे.सदर इमारत सध्या तासगांव नगरपरिषद तासगांव यांचे अखत्यारीत आहे.तेथे किमान 100 बेडची व्यवस्था उपलब्ध आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी तासगांव येथील आरोग्य शिक्षण पथक, तासगांव येथे इंटर्नशीपकरिता येतात. त्या अनुशंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नियमानुसार हॉस्पिटलच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आलेले आहे.तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या विद्याथ्यांना इंटर्नशीपकरिता हे हॉस्पिटल कार्यान्वित केल्यास चांगली सोय उपलब्ध होणार आहे. सदर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज अंतर्गत “कस्तुरबा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कार्यान्वित करणेकरिता अतिरिक्त पदस्थापनेची आवश्यकता आहे.तसेच तेथे आयुर्वेदिक व होमिओपॅथी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांकरिता इंटर्नशीप सुरु करता येवू शकते सदर हॉस्पिटलकरिता लागणारी पदस्थापना मंजुर करुन पुर्ण क्षमतेने हे हॉस्पिटल कार्यान्वित केल्यास तेथे सामान्य लोकांसाठी सर्व अद्ययावत वैद्यकीय सुविधा पुरविल्या जावून त्यांची सोय होवू शकते.त्यामुळे हे हॉस्पिटल सुरू करण्यासंदर्भात मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली होती.त्या चर्चेच्या अनुषंगाने सदर अद्ययावत “कस्तुरबा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल” कार्यान्वित करणेसाठी हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली संचालक संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मुंबई,आयुक्त वैद्यकीय शिक्षण विभाग मुंबई,प्रधान सचिव वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मुंबई,मा.अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज,मा. मुख्याधिकारी तासगांव नगरपरिषद, तासगांव व संबंधित विभागाचे अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करणे गरजेचे असल्याचे लक्षात आले,त्या अनुषंगाने खासदार संजय काका पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे प्रभाकर बाबा यांनी यावेळी सांगितले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.