प्रतिष्ठा न्यूज

सांगली जिल्ह्यातील 124 कोटी खर्चाचे 2 रेल्वे उडाण पूल खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रयत्नामुळे पूर्ण : 17 डिसेंबर रोजी दोन रेल्वे पुलांचे उद्घाटन केंद्रीय मंत्री निती गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत नागपूरातून ऑनलाइन उद्घाटन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील 124 कोटी खर्चाचे 2 रेल्वे उडाण पूल खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रयत्नामुळे पूर्ण झाले आहे. 17 डिसेंबर रोजी मिरज जंक्शन व भिलवडी रेल्वे स्टेशन जवळील या दोन रेल्वे पुलांचे उद्घाटन केंद्रीय मंत्री निती गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत नागपूर येथून ऑनलाइन उद्घाटन होणार आहे.

खासदार संजय काका पाटील यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची वारंवार भेट घेऊन मंजूर करून घेतलेल्या सुमारे 5000 कोटी रुपये खर्चाच्या पुणे-सांगली-मिरज-लोंढा -बेंगलोर या सेमी हाय स्पीड जलद रेल्वे मार्गावर रेल्वे विद्युतीकरण पूर्ण झाले असून दुपदरीकरण देखील पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.

सांगली जिल्ह्यातील 33 लाख लोकांनी 50 वर्षांपासून रेल्वे विद्युतीकरण व दुपदरीकरणाचे पाहिलेले स्वप्न आज प्रत्यक्षात साकारत आहे.

या प्रकल्पा दरम्यान खासदार संजय काका पाटील यांनी नितीन गडकरी साहेब, तत्कालीन रेल्वे मंत्री व रेल्वे राज्यमंत्री पियुष गोयल, अश्विनी वैष्णव, रावसाहेब दानवे ,श्रीमती दर्शनाबेन जर्दोष , उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अशा अनेक मान्यवरांच्या भेटी घेऊन सांगली जिल्ह्यासाठी भरीव निधी मंजूर करून घेतला होता.

खासदारांच्या या प्रयत्नांमधून सांगली शहरात विश्रामबाग येथे एक भव्य उडाण पूल आज दिमाखात उभा राहिला आहे.
रेल्वे क्रॉसिंग साठी तासनतास वाहनांना विश्रामबाग येथे उभे राहावे लागत होते ते आता उभे राहावे लागत नाही. त्यामुळे सांगली, मिरज शहरातील लोकांचा खूप वेळ व इंधन वाचला आहे.

त्याचप्रमाणे मिरज रेल्वे जंक्शन नजिक सुमारे 36 कोटी रुपये खर्च करून नवीन रेल्वे उड्डाण पूल उभारण्यात आलेला आहे. मिरज रेल्वे जंक्शन हे महाराष्ट्रातील एक मुख्य रेल्वे जंक्शन असून या रेल्वे जंक्शन वर रेल्वे गाड्यांची खूप वर्दळ असल्यामुळे रेल्वे गेटवर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना पसंतास उभे राहावे लागत होते व वाहतुकीची देखील कोंडी होत होती. त्याचप्रमाणे पावसाळ्यात देखील वाहन चालकांना त्रास होत होता. आता मिरज जंक्शन शेजारी हा उड्डाणपूल बांधल्यामुळे वाहनधारकांना रेल्वे गाड्यांच्या क्रॉसिंग साठी थांबवावे लागणार नाही.

भिलवडी रेल्वे स्टेशन नजीक सोमवारी 90 कोटी रुपये खर्च करून एक भव्य रेल्वे उड्डाणपूल उभारण्यात आलेला आहे. या उड्डाणपुलामुळे सांगली जिल्ह्यातील वाळवा, तासगाव, पलूस, कडेगाव खानापूर, आटपाडी तालुक्या दरम्यान होणारी रस्ते वाहतूक सुरळीत व जलद होणार आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गतिशक्ती योजनेअंतर्गत रेल्वे वाहतूक तर जलद व्हावीच पण त्याबरोबर रस्ते वाहतूक देखील जलद व्हावी व रेल्वे गाड्यांसाठी वाहनधारकांना खोळंबून राहावे लागणार नाही या प्रकारची संकल्पना होती ती आता साकारत आहे. सांगली जिल्ह्याला रुपये 124 कोटी रुपयांची दोन उड्डाणपुले पूर्ण होऊन दिनांक 17 डिसेंबरला त्यांचे उद्घाटन होणार आहे.

सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांकडून याबाबतीत समाधान व्यक्त होत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.