प्रतिष्ठा न्यूज

निसर्ग सहलीतुन विद्यार्थ्यांनी लुटला मनशोक्त आनंद: धनजी तांडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा उपक्रम

प्रतिष्ठा न्यूज/ वसंत सिरसाट
उमरा : लोहा तालुक्यातील धनजी तांडा, येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची निसर्ग सहल याच परिसरातील जागृत देवस्थान असलेल्या “स्वयंभू महादेव मंदिर” या ठिकाणी नेण्यात आली होती.
अभ्यासक्रमातील पाठानुसार विध्यार्थ्यांना निसर्गातील आनंद घेता यावा जमिनीवरील विविध प्रकारचे पिके, झाडे, गवत, खडकाळ व सुपीक जमीन फळे फुले यांची माहिती मिळावी म्हणुन या निसर्ग सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक- बि.आर. वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना मातीतून पायी चालल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण चांगले राहते तसेच निसर्गातील शुद्ध हवा, पाणी, उनवारा, वेगवेगळ्या पिकांचे नावे व महत्त्व यांची माहिती दिली. तर सहाशिक्षक-श्रीराम बेटकर यांनी खेळातून गाणी म्हणणे, गोष्टी, कविता, या उपक्रमातुन विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले.
या निसर्ग सहलीतून विद्यार्थ्यांनी मनशोक्त आनंद घेत सोबत आणलेल्या खाऊचा डबा पोटभर खाला. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेह-यावर आगळावेगळा आनंद दिसुन येत होता.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.