प्रतिष्ठा न्यूज

तासगावात यूबीडी रन मॅरेथॉनने उत्साहात साजरा झाला डॉक्टर्स डे …

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : युनायटेड बी ए एम एस डॉक्टर्स या संघटनेच्या वतीने डॉक्टर्स डे निमित्त रविवारी जिल्हा मॅरेथॉनचे आयोजन संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी करण्यात आले होते.
“रन फॉर कम्प्लीट सोशल हेल्थ” चा नारा घेवून संपूर्ण जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील घटक तासगावच्या रस्त्यावर धावले.मॅरेथॉनचे उद्घाटन मा. श्री सुमित गरुड जिल्हा पोलीस प्रमुख विजयवाडा,मा.श्री डॉ विक्रमसिंह बांदल प्रांताधिकारी विटा,मा.श्री अण्णासाहेब जाधव डी वाय एस पी सांगली शहर यांनी केले.यावेळी मा. श्री बिभीषण सारंगकरसिविल सर्जन सांगली,मा.श्री भानुदास निंभोरे पोलीस निरीक्षक तासगाव यांची प्रमुख उपस्थिती होती.
या मॅरेथॉन मध्ये 10 कि.मी.पुरुष गटात प्रथम डॉ संजय पाटील आष्टा द्वितीय डॉ.बसवराज पाटील मिरज, तृतीय डॉ.महेश माळी विटा,
तसेच महिलां गटात प्रथम डॉ.कविता जाधव तासगाव,द्वितीय डॉ स्नेहल काळे तासगाव,तृतीय डॉ.विनया सारंगकर सांगली यांनी नंबर मिळवले.
तर 5 किमी पुरुष गटात अर्जुन नलावडे,सुहास पाटील,जाफर मुल्ला यांनी तर महिला गटात वैष्णवी कुलकर्णी,रूपाली जाधव,आकांक्षा सुखदेव यांनी अनुक्रमे नंबर मिळवले.
मॅरेथॉन साठी जत, विटा, पलूस,आष्टा सांगली,मिरज अशा संपूर्ण जिल्ह्यातून डॉक्टर्स मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ ज्ञानेश्वर शिवणकर,डॉ संतोष पाटील, डॉ जाहीर नदाफ,डॉ.वैभव बरगुले,डॉ विजय माने,डॉ.मिलिंद जाधव,डॉ मनीषा शिंदे व सर्व यूबीडी चे डॉक्टर्स यांनी मॅरेथॉनचे संयोजन केले होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.