श्री शिवाजी काॅलेज कंधारच्या प्राचार्यपदी डॉ. जोगदंड पाटील यांची निवड : शिक्षक सेनेच्या वतीने सत्कार
प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार
नांदेड : प्रा.डाॅ.सूर्यकांत पाटील जोगदंड सर यांची श्री शिवाजी काॅलेज कंधार येथे प्राचार्य पदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल शिक्षक सेनेच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला.
याप्रसंगी प्रा. डॉ.जोगदंड यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देताना महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष मा.संतोष अंबुलगेकर सर, जिल्हासरचिटणिस तथा उपप्राचार्य येसलवाड, पत्रकार राजू पाटील पवार,प्रा.माधव ब्याळे सर आदिजण उपस्थित होते.