प्रतिष्ठा न्यूज

तासगावकर भावनाशून्य झालेत काय? 

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : अंतर्गत गटार कामासाठी पालिका क्षेत्रातील अनेक ठिकाणी वापरात असलेले चांगले रस्ते उकरल्याने गेल्या दोन् वर्षा पासून तासगावकरांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.सामान्य नागरिक शांत राहून हा त्रास सहन करत आहेत.याचा अर्थ ते भावना शून्य झालेत का ? त्यांना आपल्या अधिकाराची जाणीव नाही का? सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी किमान आपल्या हक्कासाठी काही लोकांनी अनेक वेळा निवेदन दिली, त्यावर प्रशासनाने पाहणी केली.मात्र उपयोग झाला नाही.याबाबत पालिकेच्या बैठकित चर्चाही झाल्याचे समजते.यावेळी ज्यांना कामाचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आहे त्यांना आवश्यक त्या सूचनाही देण्यात आल्याच सांगण्यात येतंय,परंतु याचा काही उपयोग झाल्याचे दिसून येत नाही.ज्या ज्या ठिकाणी रस्ता उकरलेला आहे त्याठिकाणी आज चिखल,दलदल अनेक अपघात होतील अशीच परस्थिती आहे.अनेक गल्ल्यातील उकरलेले रस्ते गेल्या दोन वर्षापासून तसेच आहेत.शहरालगत असणाऱ्या अनेक कॉलनीतील रस्ते ठेकेदारा कडून फक्त मुरूम,क्रश टाकून चिखलयुक्त रस्ता मुजवन्याच बोगस कामं करण्यात आले आहे.याकडे सोईस्करपणे पालिकेने दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.  प्रशासनातील अधिकारी व त्यांचे सहकारी यांच्यामुळे या ठेकेदारांचे फावले असल्याची चर्चा संतप्त नागरिकांच्यात आहे.काही ठिकाणी काम अर्धवट असताना बिले अदा केली असल्याचीही चर्चा आहे.यावरून यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा संशय येतोय.याबाबत तक्रारी करूनही त्यात बदल झालेला दिसत नाही.याची शहानिशा करून पालिकेच्या मुख्याधिकाऱ्याणी लवकरात लवकर हे काम चांगल्या क्वालिटीने पूर्ण करून घ्यावे अशी मागणी सामान्य तासगावकर करत आहेत.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.