तासगाव येथील ज्येष्ठ व्यापारी अरुण शहा यांचे निधन
प्रतिष्ठा न्यूज
तासगाव ता.२१: तासगाव येथील ज्येष्ठ व्यापारी व प्रफुल्ल स्टोअर्सचे मालक अरुण शहा वय ७६ वर्षे यांचे आज दुपारी हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी कल्पना,मुलगा धवल,मुलगी कविता आणि रिंकू असा परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी आठ वाजता तासगाव येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.