प्रतिष्ठा न्यूज

रोटरॅक्ट क्लब सिंहगड कॉलेज मध्ये वादविवाद स्पर्धा संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
पंढरपूर प्रतिनिधी : चांगल्या कल्पनांसाठी खऱ्या नवीन ते साठी मानवी संवाद संघर्ष वादविवादाची गरज आहे यानिमित्त सिंहगड कॉलेज मध्ये रोटरॅक्ट क्लब यांच्या वतीने शनिवार दिनांक २६ नोव्हेंबर रोजी वाद विवाद स्पर्धा केली होती. ही स्पर्धा उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.
वादविवाद स्पर्धा ही अतिशय ज्ञानपूर्ण आणि आनंददायक कार्यक्रम होता ज्यामध्ये विवादाचे विषय होते. ठरवलेले लग्न विरुद्ध प्रेम विवाह, संगणक शिक्षकाची जागा घेऊ शकतो की नाही?, आस्तिक आणि नास्तिक आदी विषय सर्व फेऱ्या तार्किक आणि वैद्य विधानांसह पूर्ण झाल्या. यामध्ये अंतिम लढाई कु‌. श्रद्धा कुलकर्णी, संकेत पुजारी यांच्यामध्ये झाली होती यां विद्यार्थ्यांना “स्त्री आणि पुरुष समानता आवश्यक आहे का? “हा विषय मिळाला होता. त्यामुळे यांची लढाई खूप रंगत झाली. हि लढाई पंधरा मिनिटं चालली आणि दोघांनी पण आपले मुद्दे स्पष्ट आणि परखडपणे मांडले. या स्पर्धेचा विजेता संकेत पुजारी ठरला आणि उपविजेती कु. श्रद्धा कुलकर्णी ठरली. या स्पर्धेचे परीक्षण प्रा. सुमित इंगोले सर, समृद्धी ताठे, उदयन ताठे, विश्वजीत कस्तुरे, श्वरी ताठे यांनी काम पाहिले.
या स्पर्धेचे अध्यक्ष करण वीर व ऋषिकेश म्हमाने होते. कार्यक्रम यशस्वी पूर्ण होण्यासाठी अध्यक्ष समृद्धी ताठे, सचिव विश्वजीत कस्तुरे आणि सर्व रोटरॅक्ट क्लब सिंहगड कॉलेजच्या सभासदांनी परिश्रम घेतले त्यामुळे ही स्पर्धा उत्साहात पार पडली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.