प्रतिष्ठा न्यूज

सांगली शहिद दौडची सांगता उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गेट वे ऑफ इंडिया (मुंबई) येथे संपन्न

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : शहीद अशोक कामटे स्मुर्ती फाउंडेशन संस्थेच्या वतीने सांगली ते मुंबई शहिद दौडचे आयोजन करण्यात आले होते. या ४७० किमी. सांगली ते मुंबई शहिद दौडची सांगता गेट वे ऑफ इंडिया मुंबई येथे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. ही दौड सांगलीतील शहिद अशोक कामटे चौक ते गेट वे ऑफ इंडिया ( मुंबई ) ईथपर्यंत होती. या दौडीचा मार्ग सांगली कराड सातारा पुणे लोणावळा पनवेल मुंबई असा. सांगलीतून ही दौड २२/ ११ /२०२२ रोजी सकाळी ६:३० वाजता निघाली असून २६/११/२०२२ रोजी सकाळी ०८:३० वाजता गेट वे ऑफ इंडिया (मुंबई) येथे पोहचली.
शहिद मॅरेथॉन चे ४७० किमी अल्ट्रा रन पूर्ण केलेले विद्यार्थी या दौडीचे विशेष आकर्षण ठरले. त्यामध्ये १. स्पप्नील माने २. अमित कांबळे ३. प्रतिक नलवडे ४. वैभव आटुगडे ५. जयदिप घार्गे ६. आदित्य लोखंडे ७. सेहवाग गोसावी ८. सत्यजित पाटील ९. प्रथमेश बनसोडे १०. अमीत सोलनकर ११. अक्षय पाटील १२. अजय केंगार १३. स्वप्नील कोळेकर १४. इरफान जमादार १५. चंद्रकांत निवरगी १६. अमित लेंगरे १७. विश्वनाथ सुर्यवंशी १८. मयुर लोंढे १९. ओंकार सुतार २०. हर्षद एटम २१. एकलव्य हाबळे २२. तानाजी पांढरे २३. प्रथमेश नलवडे २४. राज मोरे २५. चैतन्य कदमआदींचा सहभाग होता.
या दौडीचे आयोजन कामी समित कदम, डॉ. चंद्रशेखर हल्लींगळे व इनायत तेरदाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश रोकडे, नजीर मुजावर,देवदास चव्हाण, घनश्याम उके, निलेश मिसाळ, ललित छाजेड, दीपक पाटील, अजित दुधाळ, सचिन खोंद्रे, शिवाजी शिंदे, किसन, दिनेश छांजेड, संतोष जाधव,अभिजित भोईटे, प्रदीप उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.