प्रतिष्ठा न्यूज

माजी आमदार- शिंदे याची गाव चलो अभियानांतर्गत बुधगाव या गावी भेट

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : भाजपा नेते माजी आमदार- शिंदे याची गाव चलो अभियानांतर्गत बुधगाव या गावी भेट दिली.
श्री.नितीन शिंदे यांनी बुधगाव गावचे नागरिकांशी सवांद साधत,शिंपी व भोई समाज बांधवांशी चर्चा करून बुधगाव गावचे सुपुत्र श्रीनगर येथे कार्यरत असणारा जवान श्री.अवधूत शिंपी यांची भेट घेतली.
केंद्र सरकार यांच्या २०१४ – २०२४ या दहा वर्षाच्या काळामध्ये देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी घेतलेले निर्णय व विविध योजनेचे माहिती गावकऱ्यांना देण्यात आली.त्या मध्ये पंतप्रधान आवास योजना,उज्वला गॅस योजना,शौचालय युक्त भारत,आयुष्यमान भारत या योजनेची माहिती देऊन अयोध्या मध्ये श्री.राम मंदिर उभारणे तसेच गडकोट किल्लेचे संवर्धन व ४० कोटी जनतेला मोफत धान्य अशा अनेक योजनेची माहिती माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिली अजून योजनेचे ज्यांनी लाभ घेतला नाही त्यांनी विविध योजनेचे लाभ घ्यावा.असे आव्हान माजी आमदार नितीन शिंदे यांनी केले.
गावचलो अभियान कार्यक्रमाचे संयोजक बाळासाहेब पाटील,बुधगाव ग्रामपंचायत सदस्य शुभांगी कोळी यांनी नियोजन केले.
या कार्यक्रमास पंचायत समिती उपसभापती विक्रम पाटील,बुधगाव सरपंच वैशाली पाटील,किसान मोर्चा जयवंत पाटील,मनोहर पाटील, विनायक शिंदे,जयश्री पाटील,किसान मोर्चा जयवंत पाटील,डॉ.सर्जेराव कदम यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.