प्रतिष्ठा न्यूज

जत तालुक्यातील उटगी येथे राहते घर जळून दीड लाखाचे नुकसान, तुकाराम बाबा मदतीला धावले

प्रतिष्ठा न्यूज
जत प्रतिनिधी : जत तालुक्यातील उटगी येथे राहत्या घराला आग लागून झालेल्या दुर्घटनेत दीड लाखाचे नुकसान झाल्याची घटना घडली . चिखलगी भुयार मठाचे सद्गुरू संत बागडे बाबा मठाचे मठाधिपती, मानवामित्र संघटनेचे सर्वे सर्वा ह.भ.प. तुकाराम बाबा महाराज यांनी घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून आर्थिक मदत व संसारोपयोगी वस्तू मदत दिली आहे . याबाबत चे सविस्तर वृत्त असे की उटगी गावातील उटगी ते हळळी रस्त्याजवळ असलेल्या कोळगेरी वस्ती येथे सदाशिव सिद्राया कोळगेरी यांच्या झोपडी वजा पत्र्याच्या घराला सकाळी आठ च्या सुमारास अचानक आग लागून दीड लाखाचे नुकसान झाले यामध्ये सोने ,पैसे , संसारोपयोगी साहित्य व विविध धान्यांचा समावेश आहे .शेतकरी कुटुंब असलेले सदाशिव कोळगेरी यांच्या राहत्या घराने अचानक पेट घेतल्याने कुटुंब उघड्यावर पडल्याची माहिती मिळताच चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा ह.भ.प.तुकाराम बाबा महाराज यांनी धावती भेट देऊन कुटुंबीयांना आर्थिक मदत आणि संसारोपयोगी साहित्य देवून सांत्वन केले .यावेळी तुकाराम बाबा महाराज यांनी झालेल्या दुर्घटनेबाबत हळ हळ व्यक्त करत विविध सामाजिक क्षेत्रातील संस्थांनी , समाजकारण,राजकारण करणाऱ्यांनी कोळगेरी कुटुंबीयांना मदतीचा हात देण्याचे आवाहन केले आहे .यावेळी त्याला प्रतिसाद देत विजयालक्ष्मी सहकारी पतसंस्था उटगी चे संस्थापक अध्यक्ष महांतेश पाटील यांनी जळीतग्रस्त कुटुंबीयांना एक हजाराची मदत दिली आहे यावेळी महांतेश पाटील,गुरुराज कोळगेरी, संजय माळकोटगी सह नागरिक उपस्थित होते . घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे कर्मचारी अल्लाबक्ष मुल्ला,धानाप्पा कोळी यांनी घटनेचा पंचनामा केला आहे .
टीप: ह.भ.प.तुकाराम बाबा महाराज म्हणाले की सद्गुरू बागडे बाबा मानव मित्र संघटनेला उटगी येथील राहत्या घराला आग लागून मोठे नुकसान झाल्याची बातमी मिळाली. घटनास्थळाची तात्काळ पाहणी करत जळीतग्रस्तांना भेट देवून सांत्वन केले आहे . झालेल्या घटनेत कोळगेरी कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.पूर्ण घर जळल्याने कुटुंब उघड्यावर पडले आहे .फुल न फुलाची पाकळी म्हणून आम्ही मदत केली आहे सन 2022 व 2023 मध्ये शेकडो जळीत ग्रस्तांना मानव मित्र संघटनेकडून मदत दिली आहे . सदर घटना अत्यंत दुर्दैवी असून तालुक्यातील अनेक विविध क्षेत्रातील मान्यवरांनी जळीतग्रस्तांना मदतीचा हात द्यावा असे आवाहन करत आहे . प्रशासनाने ही योग्य मदत द्यावी अशी मागणी करत आहे .

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.