प्रतिष्ठा न्यूज

तासगावच्या स्केटिंग खेळाडूंनी मिळवले यश…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:16 वी राज्य रोलर म्युझिकल चेअर आणि स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा दिनांक 03 व 04 फेब्रुवारीला शेगाव येथे पार पडली.या स्पर्धेचे आयोजन बुलढाणा जि.रोलर म्युझिकल चेअर असोसिएशन,व महाराष्ट्र म्युझिकल चेअर आणि स्केटिंग स्पोर्ट्स असोसिएशन रोलर म्युझिकल चेअर आणि स्केटिंग स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया संलग्न स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया यांनी केले होते.या स्पर्धेमध्ये तासगावच्या थोरात स्केटिंग अकॅडमीच्या 3 विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत हरीकीशण जाधव याने 6 वर्षा वयो गटात musical chair स्केटिंग या प्रकारात गोल्ड मेडल,तर चैतन्य चौधरी 8 वर्षे वयोगटात musical chair स्केटिंग अँड स्पीड स्केटिंग या प्रकारात 2 bronze मेडल,आणि अभ्युदय श्रीकांत पाटील 8 वर्षा वयोगटात musical chair स्केटिंग या प्रकारात bronze मेडल पटकाविले.या खेळाडूंना मार्गदर्शक आंतरराष्ट्रीय खेळाडू तसेच कोच सतीश थोरात यांचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.