प्रतिष्ठा न्यूज

आरक्षण मिळत नसल्याचा निषेध करत कामळज येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड :- मुदखेड तालुक्यातील कामळज येथील तरुण संजय गोविंदराव खानसोळे वय 35 वर्षे यांनी दि.15 मार्च 2024 रोज शुक्रवारी पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
सदर तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांने शासनाचा जाहीर निषेध करत मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने माझ्या लेकरा बाळाचे भविष्य अंधारात दिसत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मी आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मयत संजय खानसोळे यांच्या पश्चात आई, वडील, तीन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नसल्याने जिल्ह्यात आत्महत्या करण्याच्या प्रमाणात वाढच होत आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.