प्रतिष्ठा न्यूज

संजयकाका पाटील यांच्या विजयाची हॅट्रिक करूया -विजया रहाटकर यांचे आवाहन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. १५: सांगली लोकसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार संजय खासदार संजयकाका पाटील यांच्या विजयाची यावेळी आपल्याला हॅट्रिक करायची आहे. तसा संकल्प सर्वजण करूया, असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांनी शुक्रवारी येथे केले.
विजया रहाटकर यांनी आज खासदार संजयकाका पाटील यांच्या सांगली मार्केट यार्ड येथील जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी त्यांचे स्वागत भाजपा सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी केले.
श्रीमती रहाटकर म्हणाल्या, या निवडणुकीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघातून संजयकाका पाटील तिसऱ्या खेपेस निवडणूक लढवत आहेत. यापूर्वी त्यांनी याच मतदारसंघात दोन वेळा देदीप्यमान विजय मिळवला आहे. या खेपेसही प्रचंड मताधिक्याने त्यांना विजयी. करून आपल्याला विजयाची हॅट्रिक करायची आहे. तसा सर्वांनी संकल्प करायचा आहे. संजयकाका पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्यासाठी अथक प्रयत्न करायचा निर्धार आणि संकल्प सर्व उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी केला.
यावेळी भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस स्वाती शिंदे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य स्मिता पवार, गटनेत्या भारती दिगडे, भाजपा महिला मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे-पाटील, सरचिटणीस उर्मिला बेलवलकर तसेच सर्व महिला मोर्चा पदाधिकारी उपस्थित होत्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.