प्रतिष्ठा न्यूज

तीर्थक्षेत्र व पर्यटन विकास योजनेसाठी साडेअठरा कोटी रुपये मंजूर : खासदार संजयकाका पाटील यांची माहिती; सांगली लोकसभा मतदारसंघात होणार कामे

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि.१५ : सांगली लोकसभा मतदार संघातील देवालय आणि तीर्थक्षेत्रे यांच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाने १३ कोटी ५६लाख रुपये निधी मंजूर केला आहे. तसेच मतदार संघातील सहा ठिकाणी पर्यटन विकासासाठी
पाच कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.खासदार संजयकाका पाटील यांनी ही माहिती दिली. या निधीतून सांगली लोकसभा मतदारसंघातील पलूस, मिरज, कवठेमहांकाळ, खानापूर, जत आणि आटपाडी या तालुक्यात तीर्थक्षेत्र विकासाचे काम केले जाणार आहे. हरिपूर ,औदुंबर ,भिलवडी, माळवाडी, कुमठे आणि आंधळी येथे पर्यटन विकासाचे काम केले जाणार आहे, असेही खासदार पाटील यांनी सांगितले.
तीर्थक्षेत्र विकास योजनेतून मंजूर झालेल्या कामांचा तपशील असा: १) श्री भुवनेश्वरी देवी मंदिर, भिलवडी, तालुका पलूस, (२कोटी रुपये), २) श्री जीतसिद्ध मंदिर, ब्रम्हनाळ, तालुका पलूस( दोन कोटी रुपये) ३)श्री संगमेश्वर देवालय, हरिपूर, तालुका मिरज( तीन कोटी रुपये)४) श्री बिरोबा देवालय, आरेवाडी, तालुका कवठेमहांकाळ (२कोटी रुपये), श्री लिंगेश्वर महाराज मठ, आळसंद ,तालुका खानापूर( एक कोटी रुपये), श्री भैरवनाथ मंदिर , बिळूर,तालुका जत( २ कोटी रुपये), श्री खंडोबा मंदिर ,दिघंची, तालुका आटपाडी (एक कोटी ५६ लाख रुपये ).
कृष्णा काठावरील भिलवडी हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे. याच भिलवडीमध्ये श्री भुवनेश्वरी देवीचे प्राचीन मंदिर आहे. दरवर्षी नवरात्रात तेथे मोठा उत्सव साजरा होतो. ब्रम्हनाळ येथील श्री जीतसिद्ध मंदिर प्राचीन आहे. सांगलीजवळच्या हरिपूर येथील कृष्णा- वारणा नद्यांच्या संगमावरील श्री संगमेश्वर देवालय हे एक प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्रही झपाट्याने विकसित होत आहे.
कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी येथील श्री बिरोबा देवालयालाही फार मोठा प्राचीन इतिहास आहे. या ठिकाणी दरवर्षी गुढीपाडव्यानंतर मोठी यात्रा भरते. जत तालुक्यातील बिळूर येथील श्री भैरवनाथ मंदिरही प्राचीन आहे. तसेच आटपाडी तालुक्यातील दिघंची येथील श्री खंडोबा मंदिरालाही मोठा इतिहास आहे.
या सर्व तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यात यावा अशी मागणी होती. खासदार संजयकाका पाटील यांनी महाराष्ट्र शासनाकडे यासंदर्भात पाठपुरावा केला. त्यामुळे शासनाकडून सांगली लोकसभा संघातील तीर्थक्षेत्र विकासासाठी हा भरीव निधी मंजूर झाला आहे.
पर्यटन विकासासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे असे खासदार पाटील यांनी सांगितले.
पर्यटन विकासासाठी मंजूर झालेल्या निधीचा तपशील असा: १) श्री संगमेश्वर देवालय हरिपूर, तालुका मिरज ( १ कोटी २५ लाख), २) श्री दत्त मंदिर औदुंबर, तालुका पलूस (१ कोटी २५ लाख), श्री भुवनेश्वरी देवी , भिलवडी, तालुका पलूस(१ कोटी २५ लाख),श्री क्षेत्र निशिदी, माळवाडी, तालुका पलूस (४५ लाख), श्री नरसिंह मंदिर,कुमठे, (पन्नास लाख), श्री महादेव मंदिर, आंधळी,पलूस( तीस लाख).
पर्यटन विकास योजनेतून पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध सोयी सुविधा या ठिकाणी पुरवण्यात येणार आहेत.त्यामध्ये भक्तनिवास, अन्नछत्र,पार्किंगची सुविधा आदींचा समावेश असेल.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.