प्रतिष्ठा न्यूज

मातंग, बौद्ध, मराठा आणि मुस्लिम एकत्र आले तर राजकारणात राखीव जागा मिळवता येतील : डॉ. राजरत्न आंबेडकर; सांगलीत अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : मातंग, बौद्ध, मराठा आणि मुस्लिम एकत्र आले तर राजकारणात राखीव जागा मिळवता येतील असे मत दि बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजरत्न आंबेडकर यांनी व्यक्त केले. सांगली येथे साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना ते बोलत होते.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती सांगली जिल्हा यांच्यावतीने आज गुरुवारी जयंती निमित्त सांगली येथील अण्णाभाऊ साठे स्मृतिस्थळी अभिवादन करण्यात आले.
डॉ. राजरत्न आंबेडकर म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे काम सोडून येण्याचे कार्य साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी केले आहे. त्यांचा विचार माझं जगण्याची गरज आहे. अण्णाभाऊंच्या जन्म जिल्ह्यामध्ये त्यांना अभिवादन करताना आनंद वाटतो. आंबेडकर परिवारांच्या वतीने मी त्यांना अभिवादन करतो. यांच्या जन्म गावी वाटेगाव येथे सुद्धा आम्ही अभिवादनासाठी जाणार आहोत. महात्मा गांधी यांच्याबरोबर झालेल्या पुणेकरारानुसार राजकारणामध्ये असणाऱ्या राखीव जागा या आम्हाला पाहिजे तितक्या मिळत नाहीत त्या मिळवायचे असतील तर प्रामुख्याने बौद्ध, मातंग, मराठा आणि मुस्लिमांनी एकत्र आली पाहिजे. तरच राखीव जागा मिळवता येतील आणि समाजाच्या भल्यासाठी राजकारणाचा उपयोग करता येईल.
यावेळी डॉ. नामदेव कस्तुरे, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राज्य अध्यक्ष दिनेश हनुमंते, सिद्धार्थ गायकवाड, वैभव दबगडे, सुभाष माने, भिक्खू ज्ञानज्योती, आचार्य भिक्खू गोविंदो, निर्मला घाडगे, चंद्रकांत खरात, अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे सांगली जिल्हा अध्यक्ष कुलदीप देवकुळे, आकाश तिवडे, प्रमोद रास्ते, मिलिंद कांबळे, विशाल मोरे, संतोष आवळे, संतोष सदामते, तानाजी आवळे, कपिल आवळे, नितीन केंचे, शिवाजी पांढरे निलेश मोहिते अजय माने ज्ञानेश्वर केंगार प्रवीण चौगुले आबा सुवासे शितल वाघमारे गणेश खिलारे सिताराम ऐवळे, प्रशांत ढंग यांच्यासह सांगली जिल्ह्यातील कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.