प्रतिष्ठा न्यूज

पाककला ही अवगत असणे काळाची गरज आहे : सुमनताई खाडे

प्रतिष्ठा न्यूज योगेश रोकडे
सांगली : धुंडूनी देवस्थान पाहिला भाकरीत भगवान”अशी ही भाकरीची महती संत सांगून गेलेत. ज्वारीच्या भाकरीला महाराष्ट्रातील जेवणात प्राथमिक दर्जा आहे. सध्या ही आईची मायेची भाकर कालबाह्य होत आहे.त्याची कारणे अनेक आहेत.
दास बहु उद्देशीय विश्वस्त संस्था संचलित मातोश्री तानुबाई दगडू खाडे पब्लिक स्कूल मालगाव यांनी शाळेतील ५ वी ते ८ वी च्या मुलांना भाकरी शिकवण्याचा उपक्रम घेतला. त्यामागे मुख्य उद्देश म्हणजे मुलांना स्वावलंबी करणे, शिक्षण किंवा नोकरीसाठी मुले बाहेर राहिली तर त्यांना जेवण बनवता यावे हा असल्याचे संचालिका सुमनताई खाडे यांनी सांगितले.
बऱ्याच वेळा शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी बाहेर राहणारी मुलं-मुली मेसचे डबे खाऊन आजारी पडतात. याचा परिणाम त्यांच्या कामावर व शिक्षणावर होतो. जर त्यांना स्वयंपाक करता आला तर ही समस्या राहणार नाही. तसेच आईच्या स्वयंपाकात लागणारे कष्ट लक्षात येतील. या उक्रमातून हॉटेल मॅनेजमेंट ची गोडी असणारे विद्यार्थीही घडू शकतील. उद्योजकता वाढीस लागू शकते. विद्यार्थ्यांना करिअर ही करता येऊ शकते. त्यामुळे ही मुले स्वयंपाकामध्ये पारंगत व्हावीत या उद्देशाने भाकरी शेफ वर्कशॉप उपक्रम घेतला. यासाठी साधारण ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून उत्साहाने भाकरी बनवली. त्यानंतर सर्व शिक्षक व मुलांनी बनवलेली भाकरी व घरून आणलेलं भरीत पिठलं याच्यावर ताव मारत सहभोजनाचा आनंद घेतला.
या उपक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, पालकमंत्री तथा कामगारमंत्री महाराष्ट्र राज्य सुरेशभाऊ खाडे, सुशांत खाडे, स्वाती खाडे, समन्वयक ज्योत्स्ना माने, मुख्याध्यापिका सुप्रिया पाटील यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. या उपक्रमाच्या माध्यमातून मुला मुलींचा आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली. तसेच यापुढे आम्ही आईला स्वयंपाकात मदत करू ही भावना ही दृढ झाली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.