प्रतिष्ठा न्यूज

निवडश्रेणीचे नव्याने प्रशिक्षण प्राप्त केलेल्या शिक्षक बांधव वरिष्ठ निवड श्रेणी पासून वंचित राहणार नाहीत: नव्याने प्रस्ताव मागविणार : शिक्षणाधिकारी(प्रा.) डॉ.सविता बिरगे

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार
नांदेड : महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना नांदेड च्या वतीने आज निवेदन देण्यात आले. या निवेदनात २४ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या बांधवांना निवडश्रेणी पात्र साठी प्रशिक्षण आवश्यक होते बरेच बांधव प्रशिक्षण नसल्याने वंचित राहत होते नांदेड जिल्ह्यातील बरेच बांधव आहेत, आता प्रशिक्षण पूर्ण केले आहेत आता त्यांना वंचित ठेवु नये त्यांचे नव्यानं प्रस्ताव घेऊन त्यांना पात्र यादीत नावे समाविष्ट करावीत यावर शिक्षणाधिकारी मॅडम यांनी जे जे शिक्षक बांधव प्रशिक्षण पूर्ण केलेले आहेत त्यांना आता दाखल करता येणार असे आश्वासन दिले तसेच प्रलंबित प्रश्न केंद्र प्रमुख पदे शासननिर्णय नुसार भरणे, पदोन्नत मुअ, विषय शिक्षक, महाराष्ट्र दर्शन, थकीत महागाई भत्ता, दिवाळी अग्रीम सण मागणी करण्यात आली. तसेच दि. २०/१० / २०२३ रोजी जे निवेदन दिले आहे व आजच्या ज्या मागण्या दिवाळी सुट्टीत पुर्ण नाही झाल्यास जि.प.नांदेड समोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष विठुभाऊ चव्हाण, जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर, जिल्हा सरचिटणीस रवि बंडेवार, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश चिद्रावार सर, जिल्हा मार्गदर्शक शिवाजी पाटील, जयवंत हंगरगे सर, लहू पंदलवाड सर, विजय पाटील पदाधिकारी उपस्थित होते. न्यायासाठी हक्कासाठी शिक्षक सेना सदैव शिक्षक बांधवांच्या पाठीशी.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.