प्रतिष्ठा न्यूज

तासगावात फटाक्याच्या कच्च्या मालाच्या दुकानात भीषण आग ; ऐन दिवाळीत शहर हादरलें

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:सोमवार पेठ येथील कोकणे यांच्या शोभेच्या दारू कामाच्या कच्च्या मालाच्या दुकानात आग लागून भीषण स्फोट झाला असून या आगीत दुकानासह घराचे मोठे नुकसान झाले आहे.सोमवारी सायंकाळी सातच्या दरम्यान कोकणे यांच्या दुकानात कच्च्या मालास अचानक आग लागली,आणि बघता बघता या आगीने रौद्ररूप धारण केले.यावेळी दुकानात असलेल्या गंधक,सिल्व्हर,सुरमेट कोळसा, गोल्डन आदी कच्च्या मालास आग लागून स्फोट झाल्याने बघता बघता संपूर्ण दुकान आणि घर आगीत लोटले.सध्या दिवाळी असल्याने मोठ्या प्रमाणात कच्च्या मालाची साठवणूक केली असल्याने आग मोठ्या प्रमाणात भडकली अशी माहिती घटना स्थळावरून मिळाली.
सुदैवाने घरातील सर्वांना बाहेर काढण्यात आले,यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.काल आठवडी बाजार असल्याने आधीच बाजारात गर्दी आणि आग लागलेल्या ठिकाणी बघ्यानी केलेली मोठी गर्दी त्यामुळे अग्निशमन गाड्या जाण्यास आणि आग विझवण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना मोठी कसरत करावी लागली.तब्बल तीन तासाच्या अथक प्रयत्नाने तासगाव, भिलवडी,विटा,सांगली येथील अग्निशमन गाड्यानी आग आटोक्यात आणली.आगीचे वृत्त समजताच मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील,तहसीलदार रवींद्र रांजणे,पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ,यांनी घटना स्थळी धाव घेतली.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.