प्रतिष्ठा न्यूज

नाम फाउंडेशन कडुन आत्महत्या ग्रस्त शेतकरी चव्हाण कुटूंबियांचे सांत्वन

प्रतिष्ठा न्यूज / वसंत सिरसाट
उमरा : लोहा तालुक्यातील उमरा- भिमला तांडा (गोविंद तांडा) येथिल तरुण शेतकरी नागोराव तेजेराव चव्हाण वय 35 वर्षे यांनी दि.1 एप्रिल 2023 रोजी सकाळी स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती ही आत्महत्या केल्याची बातमी नांदेड येथील नाम फाऊंडेशन चे संपर्कप्रमुख भाऊराव मोरे व सल्लागार सा.रा. जाधव यांना समजताच भिमला तांडा (गोविंद तांडा) येथे जाऊन आत्महत्याग्रस्त कचटूंबियाची सर्वप्रथम भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
यावेळी त्यांनी आत्महत्या ग्रस्त शेतकरी नागोराव तेजे- राव चव्हाण यांची 2 मुले- पांडूरंग नागोराव चव्हाण-वर्ग 9 वा. व 2) भास्कर नागोराव चव्हाण- वर्ग 7 वा यांचे येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून रयत शिक्षण संस्था सातारा येथे मोफत जेवण, निवास व गणवेश आणि पदवीत्तर शिक्षणासाठी शिफारस करून रयत शिक्षण संस्थेने ती जबाबदारी भाऊराव मोरे यांनी केलेल्या शिफारशीनुसार स्विकारली.
यावेळी भाऊराव मोरे, सा.रा. जाधव, मयताची पत्नी श्रीमती चांगुणाबाई नागोराव चव्हाण, संभाजी ब्रिगेडचे पवन सिरसाट, ग्राम पंचायत सदस्य सचिन सिरसाट, मारोती राठोड, पंडित राठोड उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.