प्रतिष्ठा न्यूज

दक्षिण भारत जैन सभेला भरभरुन दान देणारा दानचिंतामणी विजय कासार : रावसाहेब पाटील यांचे प्रतिपादन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि.२०: दक्षिण भारत जैन सभेच्या वसतिगृहात शिकून यशस्वी कारकीर्द केलेले विजय कासार यांनी वेळोवेळी दक्षिण भारत जैन सभेच्या ऋणातून उतराई होण्यासाठी सभेला रु.१० लाखाचे बृहत दान दिले आहे. आज पुन्हा सभेच्या शिष्यवृत्ती निधीला रु.१ लाख व सभेच्या कोल्हापूर दिगंबर जैन बोर्डिंगला रु.५० हजाराचे दान दिले आहे. भ. महावीरांच्या जगा व जगू द्या या तत्त्वाचा खरा जैन पाईक म्हणून त्यांनी समाजासमोर दातृत्वाचा आदर्श ठेवला आहे. ते खरे दान चिंतामणी आहेत असे प्रतिपादन सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी केले. आज पुणे येथील बर्डव्हॅली हाॅटेलच्या सभागृहात अखिल भारतीय दिगंबर कासार जैन संस्थेने आयोजित केलेल्या विजय कासार यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
रावसाहेब पुढे म्हणाले, ‘ विजय कासार यांनी दक्षिण भारत जैन सभेच्या उपकाराची जाणीव ठेवून वेळोवेळी दान देऊन सभेचा पर्मनंट देणगीदार म्हणून आदर्श निर्माण केला आहे. आज जैन व बहुजन समाजातील विविध सेवाभावी संस्था, गरीब व गरजू समाज बांधव , दिव्यांग संस्था, वसतिगृहे व जैन मंदिरे यांना ७५ व्या वाढदिवसानिमित्त रु.१६ लाखांची मदत दिली. त्यांच्या या दातृत्वामुळे दक्षिण भारत जैन सभेचा शिष्यवृत्ती निधी लवकरच सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील दादा यांच्या नेतृत्वाखाली ५कोटीचा टप्पा पूर्ण करण्याची प्रेरणा मिळाली आहे.सामाजिक बांधिलकी जपणारे विजय कासार शतायुषी व्हावेत यासाठी सभेच्या त्यांना दीर्घायुरारोग्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा. ‘

यावेळी प्रा. एन.डी.बिरनाळे यांनी विजय कासार हे खरे जैन तत्वज्ञान जगतात. सभेच्या शिष्यवृत्ती निधीला त्यांनी भरभरुन दान दिले आहे. त्याचा लाभ अनेक गरजू विद्यार्थ्यांना होत आहे. त्या सर्वाचा त्यांना दुवा लाभत आहे. त्यामुळे ते निश्चितच शंभरी गाठतील. यावेळी दक्षिण भारत जैन सभेच्या वतीने रावसाहेब पाटील व प्रा. एन.डी.बिरनाळे यांच्या हस्ते त्यांचा सपत्नीक शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी दिगंबर जैन कासार संस्थेतर्फे विजय कासार यांचा मानपत्राने दानचिंतामणी पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.विविध संस्थांनीही त्यांचा सत्कार केला. मानपत्र वाचन व सूत्रसंचालन प्रा. सुभाष दगडे यांनी केले.

यावेळी विजय कासार, सौ. सरिता कासार त्यांचे साॅप्टवेअर इंजिनिअर असलेले दोन्ही पुत्र व सुना, सभेचे कोकण विभागीय उपाध्यक्ष वृषभ उपाध्ये, महामंत्री अजित शिराळकर,पोपटलाल डोर्ले, सभेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश खोत, रत्नागिरी, चिपळूण, साडवली, कारंजा, सांगली, पुणे,सोलापूर, देवरुख, खारेपाटण या भागातील कासार समाज कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.